अरविंद एज्युकेशन सोसायटी संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

अरविंद एज्युकेशन सोसायटी संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न 


पिंपरी :  अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांनी डॉजबॉल, हँडबॉल, थ्रो बॉल, लंगडी, धावणे, रिले आदी विविध क्रीडा कौशल्यांनी उत्साहात साजरा केला. 


संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून व मैदानाची पूजा करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे,


लिटल फ्लॉवर सेकंडरी स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, क्रीडाशिक्षक रायगोंडा माशाळे, रामेश्वर हराळे, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी खेळाविषयी शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी डॉजबॉल, हँडबॉल, थ्रो बॉल, धावणे, रिले, लंगडी या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत नैपुण्य दाखविले. दरम्यान, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात क्रीडा महोत्सव साजरा केला.




लंगडी, उलट दिशेने पळणे, फ्रॉग जंप, चमचा लिंबू, खो खो, बॅडमिंटन आदी खेळांचा आनंद लुटला. तसेच स्नेहभोजनाचा आनंदही चिमुकल्यांनी लुटला. उद्यानाची स्वच्छताही केली. 


आरती राव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगत खेळासोबत सकस आहार घेऊन तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले. प्रणव राव यांनी सांगितले, की उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाचा नियमित सराव करणे, तसेच एकजूट राखणे अत्यावश्यक आहे. क्रीडाशिक्षक रायगोंडा माशाळे यांनी खेळातील बारकावे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.


Post a Comment

0 Comments