अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन
पुणे : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित रांगोळी स्पर्धेत विज्ञान व वाणिज्य थीम घेऊन विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण रांगोळी साकारल्या.
विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापन, वाणिज्य आदी विषयांवर आधारित रांगोळी रेखाटून रांगोळी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. यावेळी अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, प्राचार्या शीतल मोरे, हर्षदा वाजे, वैष्णवी काळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आरती राव आणि प्रणव राव यांनी काम पाहिले. दोघांनी रांगोळी स्पर्धेसाठी निवडलेल्या थीमवर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि त्यातून विजेते निश्चित केले. प्राचार्या शीतल मोरे, शीतल मोरे, हर्षदा वाजे, वैष्णवी काळे यांनी विद्यार्थ्यांना विषय निवडीबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की विज्ञान व वाणिज्य विषयाला कलेची जोड दिली, तर विद्यार्थ्यांमध्ये विषयाची गोडी निर्माण होईल, हे ओळखूनच रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे व त्यात सहभाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची विज्ञान व वाणिज्य विषयाची गोडी वाढण्यास मदत होणार आहे.
0 Comments