पुणे : गुणवत्ता व विद्वत्तेचा उच्च दर्जा आणि नीतिपूर्ण प्रकाशन व सचोटी ही मौलिक मूल्ये सातत्याने जपणारी भारतीय संस्था म्हणून जगभरात ओळख असलेल्या ओरिएंट ब्लॅकस्वान ने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओरिएंट लाँगमन्स लिमिटेड या नावाने भारतीय कंपनी म्हणून ७ जानेवारी १९४८ रोजी तिची अधिकृतपणे नोंदणी करण्यात आली.
कंपनीला १९६१ मध्ये पहिले भारतीय अध्यक्ष लाभले. जे. रामेश्वर राव यांनी १९६४ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांचे कुटुंबीय आजही ही कंपनी चालवतात.
शालेय पुस्तकांपासून ते महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांपर्यंत, शैक्षणिक संदर्भ ग्रंथांपासून ते भाषांतरित पुस्तकांपर्यंत, काव्यसंग्रहांपासून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी ग्रंथ, नकाशे आणि शब्दकोशांपर्यंत, अगदी पुस्तकांच्या किरकोळ विक्री दुकानात सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकांपर्यंत अनेक प्रकारची प्रकाशने येथे उपलब्ध आहेत.
पद्मविभूषण पुरस्कार विजेते आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय.व्ही. रेड्डी यांच्या शब्दांत सांगायचे तर 'स्वतंत्र भारतातील प्रकाशन क्षेत्राच्या ७५ वर्षांमध्ये, देशाच्या भविष्य आणि कल्याणाच्या दृष्टीने अन्य कोणतीही कंपनी ओरिएंट ब्लॅकस्वानएवढी घनिष्टपणे गुंतलेली नाही. दर्जा, नैतिकता, उच्च निकष आणि सचोटी यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशित होणे हा आनंद आहे.'
ओरिएंट ब्लॅकस्वान आणि या समूहातील कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या इतर असामान्य कृतींमध्ये भारतातील सर्व प्रचलित आणि मृतप्राय भाषांचा अभ्यास असलेले पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया; एपीजे अब्दुल कलाम यांचे विंग्स ऑफ फायर आणि अनंत नारायण आणि पणीकर यांचे मायक्रोबायोलॉजीचे पाठ्यपुस्तक यांचा समावेश आहे.
सामाजिक विज्ञान आणि मानवशास्त्रातील काही महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये वाय.व्ही. रेड्डी यांचे इकॉनॉमिक पॉलिसीज अँड इंडियाज रिफॉर्म अजेंडा : न्यू थॉट; कृष्णकुमार यांचे एज्युकेशन, कन्फ्लिक्ट अँड पीस; रणजित गुहा यांचे ए रूल ऑफ प्रॉपर्टी फॉर बेंगॉल : अँन एस्से ऑन दि आयडिया ऑफ पर्मानंट सेटलमेंट; रजनी कोठारी यांचे पॉलिटिक्स इन इंडिया; ए
.एस. प्रभू यांचे पर्सेप्शन ऑफ लँग्वेज पेडॉगॉजी; सुसी थारू इ. (संपा.) ए वर्ल्ड ऑफ इक्वल्स : ए टेक्स्टबुक ऑन जेंडर; पार्थ चॅटर्जी यांचे आफ्टर दि रिव्होल्यूशन; सत्यजित रे यांचे अवर फिल्म्स, देअर फिल्म्स आणि अर्जुन डांगळे (सं.) पॉयझन्ड ब्रेड : मॉडर्न मराठी दलित लिटरेचर या काही मोजक्या ग्रंथांचा समावेश आहे.
ओरिएंट ब्लॅकस्वानच्या भारतीय भाषा प्रकाशन योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल. यात गेल्या काही वर्षांमध्ये वाचकांना देशभरातील भाषांमध्ये पाठ्यपुस्तके आणि संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात हिंदीपासून बांगला, मराठी आणि तेलगू अशा भाषांचा समावेश आहे.
ओरिएंट ब्लॅकस्वानच्या लेखकांच्या यादीमध्ये रक्षंदा जलील, रामीन जहांबेग्लू, एम. एन. श्रीनिवास, शाहिद अमीन, हर्ष मांडर, रिचर्ड फॉक, जेम्स मॅनोर, उपेंद्र बक्षी, रोमिला थापर, वीणा दास आणि प्रताप भानू मेहता यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
0 Comments