मुंबई, २१ मे २०२०: भारतीय शेअर बाजारा वृद्धीचा ट्रेंड कायम राखून बुधवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टीने २.११ टक्के किंवा १८७.४५ अंकांची वृद्धी करत ९ हजाराचा टप्पा पार केला. तो अखेर ९,०६६.५५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सदेखील २.०६% किंवा ६२२.४४ अंकांनी वाढून ३०,८१८.६१ अंकांवर बंद झाला. निफ्टी फार्माच्या ४ टक्के वृद्धीसह सेक्टरल निर्देशांकातही वृद्धी दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
बाजारातील गेनर्स व लूझर्स:
१२७७ शेअर्सनी बुधवारी वाढ दर्शवली तर १०४४ शेअर्सनी किंमत गमावली. तसेच १६९ शेअर्स त्यांच्या किंमतीवर स्थिर राहिले. डॉ. रेड्डीज लॅब (५.८२%), एचडीएफसी (६.१५%), एम अँड एम (५.७१%), बीपीसीएल (५.६९ %) आणि श्री सिमेंट (६.२४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्सपैकी होते.
निफ्टी फार्मा सेक्टर ४ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर ऑटो, एनर्जी आणि बँकिंग क्षेत्राने नंबर लावला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक दिवसाअखेरपर्यंत प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.
तर दुसरीकडे टॉप निफ्टी लूझर्समध्ये इंडसइंड बँक (२.६०%), भारती इन्फ्राटेल (६.९९%), हिरो मोटोकॉर्प (२.३४%), भारती एअरटेल (०.६५%) आणि वेदान्ता (१.६१%) यांचा समावेश झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजी त्यांच्या सबस्क्रिप्शनसाठीचा हक्कांचा मुद्दा सुरु केला, त्यामुळे त्यांचा शेअर जवळपास २ % नी वाढला. कंपनीने हक्कांच्या मुद्द्यांमुळे ५३,१२५ कोटींची वाढ होईल, असा प्रस्ताव ठेवला आहे. ३ जून २०२० रोजी हे सबस्क्रिप्शन पूर्ण होईल.
बजाज फायनान्सने मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीनंतर कर भरल्यानंतर ९४८ कोटी रुपयांचा नफा घोषित केला. हा नफा १९.४% नी घटला असला तरी शेअरची किंमत जवळपास ४ टक्क्यांनी वाढली.
एल अँड टी इन्फोटेकनेही मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत ४२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष नफा दर्शवल्यामुळे शेअरची किंमतदेखील ६ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षीच्या कंपनीने नोंदवलेल्या नफ्यापेक्षा यावर्षीचा नफा १२.९ टक्क्यांनी जास्त नोंदला गेला.
लसीच्या चाचण्यांमुळे बाजारात तात्पुरता उत्साह:
कोव्हिड-१९ लसीसाठीच्या चाचण्यांमुळे आजही गुंतवणूकदारांच्या भावना उत्साही राहिल्या. तथापि, अमेरिका-चीनमधील कोव्हिड-१९ च्या उद्रेकावरून सुरू असलेल्या वादाचे दुष्परिणाम आजही बाजारातील सकारात्मकतेवर झालेले दिसून आले.
देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी आज बाजारातील निर्देशांनी तसेच प्रमुख सेक्टरल निर्देशांकांनी दिवसभरात सकारात्मक व्यापार केला.
0 Comments