स्वदेशीचा पुरस्कार करत आत्मनिर्भर भारत घडवूया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या वेबीनारद्वारे आवाहन


पुणे - कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून, भारतही याला अपवाद राहिला नाही. अर्थव्यवस्था अडचणीत असताना या भयंकर साथरोगामध्ये जगाला आत्मनिर्भर होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे.

भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवण्यावर भर देणार आहोत. स्वदेशीचा पुरस्कार हाच विकासाचा मूलमंत्र ठरवून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, जल संसाधन आणि नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

एमआयटी-आर्ट, डिझाईन आणि टेक्नॅालॅाजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरद्वारा आयाोजित फेसबुक लाईव्ह वेबिनारमध्ये नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी एसओएचडीच्या डॉ. जयश्री फडणवीस आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, कोरोना या आंतरराष्ट्रीय महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. यातून सावरण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी प्रत्येकांनी सकारात्म विचार आणि मानसिकता बदलावी.

या बिकट परिस्थितीत काही मजदूर पायी आपल्या गावी जात आहेत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जगविण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या युवकांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हे गुण आहेत. देशाचे भविष्य सध्याच्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे.

कोरोना माहामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून सरकारकडे त्याचे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. गुणवत्ताधारक शिक्षणसाठी खासगी विद्यापीठांनी आता पुढे आले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी भारतातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात, मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असेल. विद्यापीठाना अपग्रेड करावे लागेल.

मुल्यात्मक शिक्षणाच्या साथीने व्हॅालिस्टिक डेव्हल्पमेंट
गडकरी म्हणाले की, मूल्यात्मक शिक्षणाची प्राचीन पंरपरा भारतात आहे. धर्म, संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान मूल्यात्मक शिक्षणाचे उगमस्थान आहेत. आता विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत बदल करून मुल्यात्मक शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास करणाऱ्या शिक्षण पद्धतीचा गरज आहे.

लीबरल अथर्थव्यवस्थेची गरज 
या माहामारीमुळे अर्थव्यवस्थेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. देशाने आपली ताकद आणि आपल्यातील कमतरता ओळखून नियोजन करावे. देशात लीबरल अर्थव्यवस्थेचे माॉडेल तयार करून अथर्थव्यवस्थेचे चक्र सुरू करावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण सह मजबूत सत्ताकारण निर्मित करून देशाला प्रगतीपथावर नेण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती असेल तर अशक्य ते शक्य होईल.



डॉ. मंगेश कराड म्हणाले की, एमआयटी-एडीटी विद्यापीठाने आत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आध्यात्माची एकत्र सांगड घालून अभ्यासक्रम तयार केला आहे. शारीरिक क्षमतांचा विकास करून भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

संवाद कौशल्य, भाषा, कला आणि डिझाईनच्या माध्यामातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे विशेष लक्ष विद्यापीठाद्वारे दिले जात आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठात गेल्या तीन वर्षापासून सर्वांगिण विकास (व्हॅालिस्टिक डेव्हलमेंट) करणारे शिक्षण दिले जात आहे.

देशातील आणि राज्यातील सरकारी आणि खासगी विद्यापीठाने या शिक्षण पद्धतीचा आत्मसात करून विद्यार्थी घडवावे, असे आवाहन मंगेश कराड यांनी यावेळी केले.

Tags - Let's create a self-reliant India by rewarding Swadeshi

Post a Comment

0 Comments