अमेरिकी फेडरलच्या प्रोत्साहनपर योजनेच्या आशेने सोन्याच्या किंमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ; चांदीच्या किंमतीत किंचितशी घट

Gold price rises in anticipation of US Federal Reserve stimulus plan


मुंबई, १३ मे २०२०: मंगळवारी स्पॉट गोल्डच्या किंमती ०.३६ डॉलर वेगासह १७०२.१ डॉलर प्रति औंसांवर बंद झाल्या. कारण घसरणा-या डॉलरने पिवळ्या धातूच्या किंमतीला आधार दिला. अमेरिकी फेडरलने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि गोठलेल्या आर्थिक विकासाच्या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

ईटीएफचे शेअर्स खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली, जे आपल्या सेकंडरी मार्केट कॉर्पोरेट क्रेडिट फॅसिलिटीच्या माध्यमातून ब्रँडमध्ये गुंतवणूक करतात. अमेरिका आणि चीनसह अनेक देशांनी केलेल्या धोरणात्मक प्रोत्साहनपर उपाय हे सोन्याच्या किंमती वाढण्यामागील कारण असू शकल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

मंगळवारी स्पॉट सिल्व्हरचे दर ०.९० अंशांच्या घसरणीसह १५.४ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एमसीएक्सवर किंमत ०.४१ टक्के कमी होऊन ४३,०५४ रुपये प्रतिकिलो‌वर बंद झाली.

सौदी अरबने उत्पादन आणि आउटपूटमध्ये आक्रमक कपातीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी डब्ल्यूटीआय क्रूड तेलाच्या किंमती ६.७ टक्क्यांनी वाढून २५.८ डॉलर प्रति बॅरलवर आल्या. त्यांनी कच्च्या तेलाची मागणी वाढवण्यासाठी उत्पादनात दररोज १ मिलियन बॅरलची वाढ करण्यावर सहमती दर्शवली.

हा फॅक्टर ओपेकच्या निर्णयासह जोडून पाहायला हवा. यानुसार मे आणि जून २०२० मध्ये उत्पादन कमी करत कपात दररोज ९.७ दशलक्ष यूनिटपर्यंत करायची होती. कोरोना व्हायरसची नवी लाट आणि हवाई तसेच रस्ते वाहतुकीवरील निर्बंधांमुळे कच्च्या तेलाच्या लाभांना अधिक मर्यादा पडल्या असल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.

Tags - Gold price rises in anticipation of US Federal Reserve stimulus plan

Post a Comment

0 Comments