पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांचा 27 लाख कुटुंबांना मिळाला लाभ

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती



पुणे - विभागात स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 77 दुकाने सुरु आहेत. स्वस्त धान्य  दुकांनामधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मे महिन्यासाठी धान्यवाटप सुरु झाले असून आतापर्यंत 51.06 % वाटप झाले आहे.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांतील लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचे नियमित धान्य वितरण 94.98 टक्के आहे. या लाभार्थ्यांना  62 हजार 244.93 मे. टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले की, केशरी कार्ड धारकांना मे महिन्यासाठी 40 हजार 401 मे.टन नियतन मंजूर झाले त्यापैकी 40 हजार 401 मे.टन धान्याची उचल झाली आहे व आजपर्यंत 29 हजार 13.82 मे.टन धान्य वाटप झाले आहे.

माहे एप्रिल ते जून 2020 या  कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति शिधाप्रत्रीकेस प्रति महिना एक किलो डाळ या परिमाणात  मोफत वितरीत करायची आहे. पुणे विभागासाठी 3 हजार 43 मे.टन डाळीचे नियतन मंजूर झाले आहे. डाळीची आवक सद्य:स्थितीत सुरु असून गोदामात डाळ प्राप्त होताच मे महिन्यामध्ये मोफत तांदूळासोबत डाळ वाटप करण्याचे नियोजन आहे.

पुणे विभागात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत पुणे विभागासाठी माहे मे 2020 करीता तांदळाचे मंजूर नियतन 62 हजार 997 मे टन असून आज अखेर त्यापैकी 29 हजार 558.60 मे टन (46.92%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले आहे.

तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना (APL)  8/-  रुपये प्रति किलो दराने प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 12/- रुपये प्रति किलो दराने प्रतिव्यक्ती 2 किलो तांदूळ वाटप करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी 40 हजार 401 मे टन गहू व तांदूळाचे नियतन मंजूर आहे. त्यापैकी 40 हजार 401 मे टन (100%) उचल केलेले आहे. त्यापैकी 29 हजार 13.82 मे टन (71.82%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे.

मे महिन्याचे नियमित मंजूर नियतन 65 हजार 537.50 मे टन असून आज अखेर 65 हजार 361.95 मे टन (99.73%) धान्याची उचल झाली आहे उर्वरित उचल 19 मे पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना  एप्रिल ते जून महिन्यासाठी डाळ  28 एप्रिल 2020 रोजी शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  चणाडाळ व तूरडाळ या दोन्हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करण्याचे नियोजन आहे.

पुणे विभागासाठी 3 हजार 41 मे. टन नियतन मंजूर झालेले आहे. डाळीची आवक सद्या चालू आहे. डाळ प्राप्त होताच  मे महिन्यामध्ये मोफत तांदळासोबत डाळ वाटप करण्याचे नियोजन आहे.

पुणे विभागात सर्वसाधारणपणे गहू, तांदूळ, खाद्यतेल,  डाळी इ. जीवनावश्यक वस्तुंची आवक ही लॉकडॉऊन पुर्वीच्या आवकच्या तुलनेत सद्यस्थितीत 90.00% आहे.

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्र असून सद्यस्थितीत  सर्व केंद्र सुरु आहेत. शिवभोजन थाळयांचे जिल्हा मुख्यालयासाठी 8 हजार 850 व ग्रामीण भागासाठी 14 हजार 250 असे  एकूण 23 हजार 100 थाळयांचे उद्दिष्ट आहे. 18 मे 2020 रोजी 21 हजार 649 थाळयांचे वाटप झाले असून 93.72 % वाटप झाले आहे.

पुणे विभागात जिवनावश्यक वस्तूंचा तसेच औषधांचा तुडवडा नाही. जीवनावश्यक वस्तू व औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Tags - 27 lakh families benefited from Antyodaya and Priority Family Beneficiary Schemes in Pune division

Post a Comment

0 Comments