कोविड-19 विरोधात लढण्यास एसकेएन काॅलेज आणि हाॅस्पीटलमध्ये जय्यत तयारी

SKN college and hospital is preparing for fight against COVID-19
File Photo
पुणे - न-हे परिसरात असलेल्या श्रीमती काशीबाई नवले मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पीटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा देऊन सर्वच स्तरातील रुग्णांना बरे केले जात आहेत. रुग्णसेवा हीच मानवसेवा या भावनेतून चालणा-या या हाॅस्पीटलमध्ये आता कोविड-19 शी लढण्यासदेखील सुसज्जित बनवण्यात येत आहे. कारण भविष्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने कुठलीही गंभीर स्थिती उत्पन्न होऊ शकते. त्यासाठीच येथे जय्यत तयारी करण्यात येत आहे.

रुग्णसेवेची उज्ज्वल परंपरा

श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालय आणि हाॅस्पीटलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सेवाभावी पद्धतीने उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा चालविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी दिल्या जाणा-या आरोग्य सुविधा पूर्णपणे मोफत असतात. याशिवाय दुस-या हाॅस्पीटलमध्ये दिल्या जाणा-या महागड्या आरोग्य सुविधा या ठिकाणी अगदीच नाममात्र दरात देऊन रुग्णांना बरे करण्याचे महत्वाचे कार्य केले जात आहे. त्यामुळे हे हाॅस्पीटल गरीब, गरजू व सर्वासामान्य रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी जय्यत तयारी : डाॅ. सरदेसाई

अशा स्थितीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात हाहाःकार माजवला आहे. भारतातदेखील या आजाराचे रुग्ण वाढतच चालले आहेत. भविष्यात जर गंभीर परिस्थिती उद्भवली तर आपणही तयार असले पाहिजे, या उद्देशाने या हाॅस्पीटलमध्ये तयारी करण्यत येत आहे, अशी माहिती एसकेएन महाविद्यालय व हाॅस्पीटलच्या प्रिन्सीपल डाॅ. शालिनी सरदेसाई यांनी दिली.

डाॅ. शालिनी म्हणाल्या की, सध्या या ठिकाणी आयसोलेशन वाॅर्ड तयार करण्यात येत आहेत. शिवाय कोरोनाशी लढण्यासाठी ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता या ठिकाणी जोमाने करण्यात येत आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात येत आहे. मास्क आणि सॅनिटायझर या ठिकाणी तयार ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हाॅस्पीटलमध्ये रुग्णसेवेसाठी 24 तास समर्पित असे तज्ञ डाॅक्टर्स, नर्सेसत तसेच कर्मचारी आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांना अत्यंत चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे.
- वेतनाची समस्यादेखील लवकरच सुटणार

गेल्या काही वर्षांपासून काही दुर्दैवी घडामोडींमुळे एसकेएन काॅलेज आणि हाॅस्पीटलला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे या ठिकाणी काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन थकले होते. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडे थकीत असलेली 19 कोटी रुपयांची रक्कम थकीत असल्याने तसेच महाविद्यालयाला येणारे शुल्क वेळेत न मिळाल्याने काही समस्या उद्भवल्या होत्या. मात्र या समस्या सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकच सर्वांचे थकीत वेतन अदा करण्यात येईल, अशी माहिती डाॅ. सरदेसाई यांनी दिली.

Post a Comment

0 Comments