पुणे - करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारच्या वतीने लाॅक डाउन घोषित करण्यात आला आहे. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अंतर्गत चालवल्या जाणा-या स्कूल ऑफ पॉलिटेक्निकच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम द्वारे ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. याला विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाददेखील मिळत आहे.
सध्याच्या घडीला कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे. भारतातदेखील कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने सरकार ने लाॅक डाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर जवळपासच सर्वच शिक्षण संस्थांचे कामकाज बंद करण्यात आले आहे.
मात्र विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी, असा निर्णय विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉ. एन. टी. राव यांच्याकडून घेण्यात आला. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या स्कूल आॅफ पाॅलिटेक्निकमध्ये आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहेत.
संस्थेच्या प्राचार्य डॉ. रोहिणी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यामुळे सर्व प्राध्यापक गूगल क्लासरूम, व्हाट्सअप, झूम अॅप, स्काईप व संस्थेचे इतर सॉफ्टवेअर या माध्यमाचा वापर करून अभ्यासक्रम पूर्ण करून घेत आहेत. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे स्काईपच्या माध्यमातून दररोज युनिव्हर्सिटीच्या दैनंदिन कामकाजाच्या आढावा ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून घेत आहेत.
आतापर्यंत एकूण 150 ऑनलाईन तासिका व साधारण 30 ऑनलाईन बैठका घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती स्कूल ऑफ पॉलिटेक्निकचे विभाग प्रमुख डॉ. सुनील कराड यांनी दिली.
0 Comments