पुणे - कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या या कठीण काळात शहरातील महानगरपालिका, कर्मचारी नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. याच महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील नामवंत बांधकाम संस्था म्हणून ओळखल्या जाणा-या गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने सॅनिटायझेशन चेंबर अर्थात निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.
नुकतेच महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर चेंबर कार्यान्वित करण्यात आले. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष विशाल गोखले हे देखील उपस्थित होते.
या वेळी बोलाताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, “आज कोरोनाच्या या संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेले हे सॅनिटायझेशन चेंबर महापालिका कर्मचा-यांना बळ देणारे असून त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.”
कोरोना विषाणू विरुद्धच्या या लढ्यात आम्ही नागरिक देखील महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या बरोबरीने उभे आहोत. ते आमचे कर्तव्यच आहे, याच भावनेतून आम्ही काम करीत असल्याचे यावेळी विशाल गोखले यांनी सांगितले.
पुढील काही दिवसात महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांबरोबरच लायगुडे हॉस्पिटल, बोपोडी हॉस्पिटल, सणस मैदान व रक्षकनगर आदी क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी आम्ही सॅनिटायझेशन चेंबर उभारणार असल्याची माहितीही गोखले यांनी दिली.
0 Comments