फ्लोरीकल्चर विभागाचे राज्याचे संचालक डाॅ. के. व्ही. प्रसाद यांचे आवाहन
File Photo
पुणे - राज्यासह देशात सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅक डाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे फुलांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. अशा स्थितीत फुल उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आलेले आहेत, मात्र याही परिस्थितीत शेतक-यांनी खचून न जाता फुलांच्या शेतीतील आपली इतर कामे उरकून घ्यावी, असे आवाहन फ्लोरीकल्चरचे राज्याचे संचालक डाॅ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.
डाॅ. प्रसाद यांनी राज्यातील फुल उत्पादक शेतक-यांना धीर देण्याच्या उद्देशाने एक अॅडव्हायजरी काढली असून, त्या माध्यमातून त्यात त्यांनी शेतक-यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, लाॅकडाउनच्या या काळात सर्वधर्मीयांचे देवस्थाने पूर्णपणे बंद आहेत. तसेच नवीन प्रतिष्ठाने उघडणे किंवा विविध प्रकारचे कार्यक्रमदेखील ठप्प आहेत. या स्थितीत फुलांची मागणी जवळपास शुन्यावर आली आहे, त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही अॅडव्हायजरी काढण्यात आली आहे.
अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे की, सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. उन्हाळ्याला सुरवात झाली आहे. या स्थिती काही प्रमाणात फुलशेतीचा व्यवसाय कमी झालेला असतो. तरीही मोठ्या प्रमाणात या काळातही फुलांचे उत्पादन होत असते. मात्र सध्या घोषित लाॅकडाउनमधील काळ शेतक-यांनी आपल्या मालाचे आणि शेतीचे उचित नियोजन करण्यासाठी कामात आणावा. यामध्ये झाडांची निगा राखणे, पुढील पिकांचे नियोजन, झाडांवर करावयाची फवारणी ही कामे करावीत.
सध्या सुरू असलेल्या काळात फुलशेतीचा व्यवसाय हा उतारावर असते. अशा स्थितीत ज्या फुलझाडांची कापणी करून त्यांच्या मुळांचा वापर पुढील पिकासाठी केला जातो. अशा पिकांना सध्या कापण्याचा विचार करू नये. हे काम नंतरदेखील केले जाते. सध्या फुलांचा बाजार जवळपास ठप्प पडलेला आहे.
अशा स्थितीत ज्या शेतक-यांकडे फुलांचा माल पड़लेला असेल त्यांनी तो फेकून देण्याऐवजी त्याच्या पाकळ्या काढून द्या वाळवायला टाकाव्यात. गुलाब, गेंदा, गुल दाउदी, चायना एस्टर यासारख्या फुलांच्या वाळलेल्या पाकळ्या नंतर नैसर्गिक गुलाल बनविण्याच्या कामात येऊ शकतात. यातून शेतक-यांना नंतर चांगले उत्पन्न प्राप्त होऊ शकते.
याशिवाय टर्ब रोज, जास्मीन, रोज यासारख्या फुलझाडांची पेरणी करण्याकडे शेतक-यांनी लक्ष द्यावे. आता पेरणी झाल्यास जून-जुलैमध्ये ती झाडे मोठे होऊन त्यापासून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते. याशिवाय जी फुलझाडे सध्या आहेत, त्यांना वाचवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करावेत. उन्हाळा वाढू लागताच झाडांमध्ये आर्द्रता कमी होते, त्यामुळे झाडांच्या सिंचनाकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.
याशिवाय स्पाइडर माइट (कोळी) पिकांसाठी घातक ठरू शकते. त्याचे निर्मूलन करण्यासाठी माइटाइडची फवारणी करावी. ज्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
या प्रकारे शेतक-यांनी योग्य ते नियोजन करावे व जेणेकरून पुढील काळात हे नुकसान भरून निघेल. एकदा सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली की, हा व्यवसाय पुन्हा चांगल्या प्रकारे बहरू लागेल. तोपर्यंत शेतक-यांनी योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन या अॅडव्हायजरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
0 Comments