जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक तर्फे उपक्रम
पुणे - जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकातील 8000 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, चहापावडर यासह जवळपास 10 वस्तूंचा या किटमध्ये समावेश आहे.
15 दिवस पुरेल, इतके अन्नधान्य आहे. जे.जे. हेल्थकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक ग्रुपकडून शहर आणि जिल्हा परिसरात जवळपास वाटप करण्यात येत आहे. तसेच आज पुणे, पिंपरी-चिंचवड व खेड चाकण भागातील काही पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूं किटचे वाटप करण्यात आले.
जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँकेचे ललित गुंदेचा, राजेंद्र बाठीया आणि नरेंद्र परमार यांनी जैन समाजाचे अनेक दानशुर व्यक्तींच्या सहसोगाने हे सतकार्य सुरु केले आहे.
कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. या काळात सर्वांनाच घरीच रहावे लागत आहे. परंतु ज्यांचे हातावरचे पोट आहे,अशा व्यक्तींवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक मदतीचा हाथ म्हणून जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँकच्या माध्यमातून आम्ही हे कार्य करित आहे. माणूसकी हा एकच धर्म समोर ठेवून कार्य केले जात आहे, असे व्यक्तव्य संस्थेकडून करण्यात आले.
पुणे शहर भागातील गरजू कुटुंबाची यादी करून या वस्तूंचे वाटप केले जात आहे. झोपडपट्टीतील कुटुंबाना अधिक प्राधान्य देण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे. तसेच तुम्ही घरातच रहा सुरक्षित रहा हा संदेश ही यावेळी देण्यात येत आहे.
पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते यांसह शहर आणि ग्रामीण भागातील गरजूंना आर्थिक, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सहकार्य केले जात आहे. सामाजिक भावनेने केलेल्या या कार्यातून गरिबांना मदतीचा हात देता येतोय, याचे समाधान व्यक्त करित यापुढेही जिथे गरज लागेल, तिथे जे.जे. हेल्थाकेअर फाऊंडेशन, जीतो फूड बँक ग्रुप सहकार्य करेल, असेही संस्थेने स्पष्ट केले. या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
0 Comments