ग्राहक पेठेतर्फे २१०० गरजू कुटुंबांना धान्याचे किट वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने उपक्रम


Distribution of food kits to 2100 needy families on behalf of Grahak Peth.

पुणे - रेशन कार्ड नसलेल्या बाहेरगावातील कुटुंबांना, गरजू विद्यार्थ्यांना ग्राहक पेठेतर्फे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत २ हजार १०० धान्याचे किट देण्यात आले. शहर व उपनगरांतील विविध भागांमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी हे किट पोहोचविले आहेत.

टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेमार्फत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले जातात. धान्यवाटपाच्या या उपक्रमाकरीता शैलेश राणीम, किरण गुंजाळ, उदय जोशी, सुनील वाणी यांसह  सूर्यकांत पाठक, संचालक  अनंत दळवी, अलका दळवी, व्यावसायिक धवल शहा, राजेश शहा, संजय फडतरे, गिरीश ओसवाल, विजय ओसवाल, सतिश जैन, जयंत शेटे यांनी पुढाकार घेतला.

सूर्यकांत पाठक म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंच्या या किटमध्ये पाच किलो गव्हाचे पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, दोन किलो साखर, एक लिटर तेल, २०० ग्रॅम चहा व २०० ग्रॅम मसाला इत्यादी साहित्य देण्यात आले आहे. पुणेकरांनी या उपक्रमाकरीता सहकार्य करुन गरजूंपर्यंत किट पोहोचविण्यास आम्हाला मदतीचा हात द्यावा. माहितीकरीता मो.-९४२२०१६८९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Tags - Distribution of food kits to 2100 needy families on behalf of Grahak Peth.

Post a Comment

0 Comments