२४ x ७ हेल्पलाईन नंबरद्वारे कोरोनाव्हायरस संबंधित डॉक्टरांचा मोफत सल्ला

Free consultation with coronavirus doctors through the XX Helpline number
File Photo
पुणे - देशात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला माहिती मिळण्याच्या दृष्टीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. सिनॅरिटी आणि डाॅक्स ऍप यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

यासंदर्भात प्रकाशित प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, देशात तसेच जगभरात COVID - 19 पीडित लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.योग्य काळजी न घेतल्यास कोणत्याही वयोगटातील लोक हे या विषाणूचा शिकार होऊ शकतात परंतु, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे वयोवृद्धांना या विषाणूचा जास्त धोका आहे. त्यांची आजाराशी सामना करण्याची शरीराची क्षमता कमी असते, त्यामुळे गंभीर आजारांपासून पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागतो.

सिनिऑरिटी आणि डॉक्स ॲप यांनी हात मिळवणी करून, एक २४*७ हेल्पलाईन नंबर लाँच केला आहे.
याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले भारतीय सर्वात मोठे शॉपिंग डेस्टिनेशन सिनिऑरिटीच्या माध्यमातून सर्व जेष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष वैद्यकीय मदत केली जाईल. 

अशा कठीण काळात कुशल वैद्यकीय तज्ज्ञांचा विनामूल्य सल्ला सहज घरबसल्या नागरिकांना मिळण्यासाठी हा २४*७ हेल्पलाईन नंबर (080 4719 3443) सुरू करण्यात आला आहे. एवढेच नाही तर माहितीपूर्ण लेख, ब्लॉग्ज, साप्ताहिक वृत्तपत्रे आणि वेबिनार यांचे एक भांडार देखील तयार केले आहे जिथे कोरोनाव्हायरसशी संबंधित सुरक्षा उपाय आणि अचूक माहिती तुम्हाला सहजरित्या मिळेल.

Post a Comment

0 Comments