चंद्रकांत मोकाटे यांचा बाणेर-बालेवाडीतील समस्यांवर नागरिकांशी संवाद

मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचे मोकाटेंचे आश्वासन


पुणे - महाविकास आघाडीचे कोथरुडचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा सध्या संपूर्ण मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून, ठिकठिकाणी नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत आहेत. चंद्रकांत मोकाटे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. 

मोकाटे यांचा बाणेर-बालेवाडी, पाषाण परिसरात प्रचार सुरू असताना नागरिकांनी मेट्रोच्या कामामुळे निर्माण होत असलेली वाहतुकीच्या कोंडीची समस्या मांडली. आज या समस्येमुळे आम्ही प्रचंड त्रस्त असल्याचेही या वेळी नागरिकांनी सांगितले. त्या वेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मोकाटे यांनी ही समस्या दूर करण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. 

सध्या हिंजेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम चालू आहे त्यामुळे बाणेर बालेवाडी व पाषाण परिसरात मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे नागरिकांना घरी जाण्यास दोन ते तीन तास उशिरा होत आहे. 

या परिसरात काही हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेस रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यास अडथळा येतो असेही या वेळी नागरिकांनी सांगितले. तेंव्हा या सर्व समस्यांवर उपाय करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेऊ, असे आश्वासन चंद्रकांत मोकाटे यांनी नागरिकांना दिले.



Post a Comment

0 Comments