टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुपने बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडियाची केली स्थापना


पुणे : उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा प्रदान करणारी जागतिक कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज आणि जगातील आघाडीच्या प्रीमियम ऑटोमोटिव्ह उत्पादकांपैकी एक, बीएमडब्ल्यू ग्रुपने मिळून बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया हा भागीदारी व्यवसाय सुरु केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

करारांवर अंतिम स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत, आता हा भागीदारी व्यवसाय पुणे, बंगलोर आणि चेन्नईमध्ये प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांमध्ये १०० कर्मचाऱ्यांसह संचालन सुरु करेल.

हा उद्योग वेगाने विस्तार करण्यासाठी सज्ज आहे, २०२५ च्या अखेरपर्यंत चार अंकी कर्मचाऱ्यांसह पुढे जाण्याची योजना आखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भारतातील अव्वल अभियांत्रिकी प्रतिभावंतांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला गेला आहे. या भागीदारी व्यवसायामध्ये बीएमडब्ल्यू ग्रुप आणि टाटा टेक्नॉलॉजीज या दोघांकडे ५०% शेयर्स आहेत. ही भागीदारी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान व बिझनेस आयटीमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देण्याचा सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते.

बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया अत्याधुनिक वाहनांसाठी सहजसुलभ, स्केलेबल सॉफ्टवेयर सोल्युशन्स तयार करून आणि अधिक चांगला डिजिटल अनुभव प्रदान करून बीएमडब्ल्यू ग्रुपच्या जागतिक धोरणासाठी पूरक ठरेल. संकल्पना तयार करण्यापासून सर्वसमावेशक अभियांत्रिकी आणि टर्नकी एसडीव्ही विकासापर्यंत, संपूर्ण उत्पादन मूल्य शृंखलेमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या क्षमता बीएमडब्ल्यूच्या भविष्यासाठीच्या मोबिलिटी सोल्युशन्ससाठी प्रमुख सॉफ्टवेयर योजनांमध्ये नावीन्याला प्रोत्साहन देईल आणि भारतातील प्रभावशाली प्रतिभावंतांपर्यंत पोहोचणे सोपे बनवेल.

'भारतातील इंजिनीयर, जगासाठी' हा सिद्धांत या भागीदारी व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरेल. भारतातील असामान्य अभियांत्रिकी व आयटी प्रतिभावंत एसडीव्ही, ऑटोमेटेड ड्रायव्हिंग, डिजिटल इन्फोटेन्मेन्ट आणि ऑटोमोटिव्ह डिजिटल सेवांसाठी धोरणात्मक सॉफ्टवेयर सोल्युशन्स विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतील. ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेयरव्यतिरिक्त, हा भागीदारी व्यवसाय बीएमडब्ल्यू ग्रुपच्या बिझनेस आयटीसाठी डिजिटल नावीन्य प्रदान करेल.

परिणामी, बीएमडब्ल्यू टेकवर्क्स इंडिया या कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कच्या डिजिटल परिवर्तनाला वेग मिळवून देईल आणि त्यासोबतच डिजिटल कस्टमर जर्नी व विक्री प्रक्रियांना मजबूत करेल. एआय ऍप्लिकेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सच्या विकासावर भर दिला जाईल, त्यामुळे सर्व प्रमुख व्यावसायिक प्रक्रियांचा वेग व कार्यक्षमता वाढेल.

हा भागीदारी व्यवसाय युवा भारतीय प्रोफेशनल्सना अशा तंत्रांवर काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो, जो जागतिक स्तरावर मोबिलिटीच्या भविष्याला आकार देईल. स्थानिक प्रतिभांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह नावीन्यांना नवे रूप देण्याप्रती या व्यवसायाची बांधिलकी ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान इकोसिस्टिममध्ये ग्लोबल इनोव्हेशन हब म्हणून भारताची ओळख मजबूत करते. महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत भागीदारी व्यवसायाचा भाग बनण्यासाठी आणि जागतिक प्रभाव निर्माण करणाऱ्या सोल्युशन्सना नवे रूप देण्यासाठी याठिकाणी अर्ज करू शकतात.

बीएमडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना टाटा टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले, "भारतात टाटा टेक्नॉलॉजीज ब्रँडचे स्थान मजबूत आहे, त्याचा लाभ घेत हा भागीदारी व्यवसाय अव्वल प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि मोबिलिटीच्या भविष्याची नवी व्याख्या रचणारी दूरदर्शी सोल्युशन्स विकसित करण्यासाठी प्रयत्न करेल.

Post a Comment

0 Comments