अप्सरा आईस्क्रीम ५३व्या वर्धापनदिनानिमित्त राबविणार 'मुस्कान' उपक्रम.



पुणे :
मुंबई येथील देशातील एक सुस्थापित आणि विश्वासप्राप्त ब्रँड असलेल्या अप्सरा आईस्क्रीमने कंपनीच्या ५३व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली.

लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि स्मितहास्य आणण्यासाठी कंपनी ५३,००० मोफत आईस्क्रीमचे वितरण करणार आहे. 'मुस्कान' हा उपक्रम ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टपासून मुंबई व पुण्यात सुरू होणार आहे. त्यानंतर अन्य शहरांमध्ये टप्प्याटप्याने तो सुरू करण्यात येणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत कंपनी ५३,००० आईस्क्रीमचे वितरण करणार आहे.हे सुमारे चार टन आईस्क्रीम आहे. देशातील ९ राज्ये आणि २५ शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. विविध स्वयंसेवी संस्था, अनाथालये, वृद्धाश्रम आणि सरकारी व गैर-सरकारी क्षेत्रांमधील विविध प्रतिष्ठानांमध्ये हे आईस्क्रीम वितरित करण्यात येईल. लायन्स क्लब, लिओ, लायन इंटरनॅशनल, स्वदेस फाऊंडेशन, लिओ इंटरनॅशनल, लिओ क्लब ऑफ अंधेरी अचिव्हर्स, रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट, श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट यासारख्या आघाडीच्या सामाजिक संस्था देखील या उपक्रमाचा एक भाग होणार आहेत.

लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटविणे व त्यांना आनंद देणारा स्कूप वाटणे, हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.तसेच, त्यांच्या जीवनात विशेषतः स्वातंत्र्यदिनाच्या शुभ प्रसंगी गोडवा आणणे हाही त्याचा उद्देश आहे.

याप्रसंगी बोलताना अप्सरा आईस्क्रीमचे संस्थापक व भागीदार श्री. नेमचंद शहा म्हणाले, “समाजाच्या विविध घटकांमध्ये आनंद पसरवणे तसेच आमचा ५३ वा वर्धापनदिन साजरा करणे हे 'मुस्कान'चे मुख्य लक्ष्य आहे. या उपक्रमाचा आरंभ १५ ऑगस्ट रोजी म्हणजे ७८ व्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे. आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहून आणि त्यांचा दिवस संस्मरणीय करून आम्हाला अत्यंत आनंद होतो. समाजाची परतफेड करणे आणि लोकांच्या जीवनात आनंदाची भर घालणे, यावर आमचा दाट विश्वास आहे.”

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अप्सरा आईस्क्रीमचे व्यवस्थापकीय भागीदार श्री .केयूर शाह म्हणाले, “समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचणे यावर या उपक्रमाचा संपूर्ण भर आहे. आम्ही आमचा वर्धापन दिन ७८ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा करणार आहोत, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये हास्य आणि आनंद पसरविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यातून सामाजिक जबाबदारीबद्दल अप्सराची कटिबद्धता दिसून येते. 'मुस्कान' या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांचे कल्याण आणि आनंद यांच्यासाठी योगदान देऊन अप्सरा आईस्क्रीम वर्धापनदिन संस्मरणीय करत आहे.”

ते पुढे म्हणाले,“हा उपक्रम देशातील २५ शहरांपर्यंत पोहोचण्याची आम्हाला उत्कंठा आहे. याप्रसंगी अनेक वर्षांपासून आम्हाला पाठबळ देणारे आमचे ग्राहक, भागीदार, कर्मचारी आणि महत्त्वाचे भागधारक यांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो.आमचे फ्रॅन्चायझी भागीदार आणि हा उपक्रम प्रचंड यशस्वी करण्यासाठी पुढे आलेल्या संघटना यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या प्रयत्नाने या उपक्रमाला एक रुपेरी किनार लाभेल, असा मला विश्वास आहे.” 

अप्सरा आईस्क्रीम हा ब्रँड बाजारपेठेत पाच दशकांपासून सक्रिय असून आपल्या स्थापनेपासूनच कंपनी ग्राहकांना प्रीमियम दर्जाचे आईस्क्रीम पुरवित आहे.

Post a Comment

0 Comments