24व्या नाथ पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना केले सन्मानित

श्री श्री श्री सद्गुरू पारवडेश्र्वर महाराज ट्रस्ट गोवा राज्यातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजन 


पुणे : श्री श्री श्री सद्गुरू पारवडेश्र्वर महाराज ट्रस्ट (गोवा राज्य) पुणे शाखा आयोजित गुरुपौर्णिमेनिमित्त 24व्या नाथ पुरस्कार सोहळाचे आयोजन 21 जुलै 2024 रोजी  पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज रोड वरील ऐश्वर्या बँक्वेट हॉल येथे कऱण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्र्वशांती दूत श्री श्री सद्गुरु भाऊ महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून   माजी आमदार दीपक पायगुडे,पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर,मोहन वर्दे ,धर्मदाय आयुक्त कैलास महाले,पुणे मनपा. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम ,येसूबाई फेम  धर्मरक्षक संभाजी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,

जिप सदस्य शंकर मांडेकर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे अध्यक्ष पुणे  गौतममुनी चॅरीटेबल ट्रस्टचे ललित जैन हे मान्यवर उपस्थित होते.अखिल भारतीय मराठा महासंघ महारष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, दिपक दाते,अशोक पवार,प्रमुख समन्वयक संजीव मिराशी उपस्थित होते

या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेत्या व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाडं यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार,ज्येष्ठ प्रशिक्षक संजय नाईक यांना शौर्य पुरस्कार,कोहिनूर ग्रुप चे संस्थापक उद्योजक  कृष्णकुमार गोयल यांना मच्छिंद्रनाथ पुरस्कार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए एल.देशमुख यांना गोरक्षनाथ पुरस्कार,


ज्येष्ठ विणकरी हभप माऊली टाकळकर यांना जालिंदर नाथ पुरस्कार,ज्येष्ठ शिल्पकार संजय परदेशी यांना कानिफनाथ पुरस्कार, गिनिजबुक रेकॉर्ड गायक जितेंद्र भुरुक यांना भरीनाथ पुरस्कार,मराठा अंतरप्रूनअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांना रेवनाथ पुरस्कार, अनाथांचे मायबाप हभप नवनाथ महाराज निम्हण यांना गहिणीनाथ पुरस्कार,

सामाजिक कार्यकर्ते उमेश महाडिक यांना नागनाथ पुरस्कार ,झाडे लावा झाडे जगवा फाउंडेशन नऱ्हे आंबेगाव संस्थेला चर्पटीनाथ पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी फिरोज मुजावर यांचे  कत्थक नृत्य ,राजेश मेहता व सहकारी लोणावळा यांनी भजनांजली कार्यक्रम  सादर केला. यावेळी विश्र्वशांती दूत मठाधिपती  श्री श्री सद्गुरु भाऊ महाराज यांनी आपले प्रवचन सादर केले.

त्यानंतर आरती करण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक संजीव मिराशी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी केले. आपल्या स्वागतपर भाषणात बोलतांना स्वागताध्यक्ष बाळासाहेब अमराळे म्हणाले की, पारवडेश्रवर महाराजाच्या सोबत  समाजासाठी काम करताना विशेष आनंद होत आहे सर्व समावेशक पुरस्कार देताना तळागाळातील तसेच व्यवसायिक उतुंग शिखरापर्यत पोहचणारे दिग्गजांना दिल्याबद्दल आनंद झाला आहे.

गायक जितेंद्र भुरुक हे गिनीज बुक रेकॉर्ड नसुन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. समाजसुधारक कार्य असेच आयुष्यभर अंखड करत राहीन असा विश्वास स्वागताध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनी दिला.

आपल्या प्रातिनिधिक भाषणात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष  पांडुरंग सांडभोर म्हणाले की नाथांच्या नावाने पुरस्कार मिळणे मी माझे भाग्य समजतो. या संस्थेचे  समाजप्रबोधनासाठीचे कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शलाका पाटील यांनी केले. 

श्री श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराजांविषयी :

श्री श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज 2 फेब्रुवारी १९८४ साली पारवाड ता. खानापूर या गावी जनहितासाठी आणि अंधश्रद्धेच्या चिखलात दारू, विडी,सिगारेट,ड्रग्स,जुगार अश्या महाभयंकर व्यसनामध्ये गुरफटलेल्या लोकांना सत्याचा मार्ग दाखवून आत्मबोधाने आत्मोधार करून, लाखो लोकांना सद मार्गाला लावून एक मोठे नर नारायणाचे कार्य गेल्या ४० वर्षा पासून करत आहेत.

देश विदेशात जावून बाबांनी हजारो लोकांना व्यसन मुक्त करून समाज सुधारून देश उभारणीच्या कार्याला तसेच विश्व शांती च्या महान कार्याला हात भार लावला. या कार्याची खऱ्या अर्थानं UNO ने दखल घेवून तसेच याची नोंद करून विश्व शांती दुत हा किताब बहाल करून जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला.

दाम्पत्य शांती आणण्यासाठी दाम्पत्य आशीर्वाद सोहळा आयोजन तसेच खेळातून शांती आणण्यासाठी शांती दौड चे आयोजन बेकारी नष्ट करण्यासाठी उद्योग धंद्याला प्रोत्साहन तसेच जगामध्ये तरुणांमध्ये येणारे वाईट परिवर्तन नष्ट करण्यासाठी तरुण पिढीवर चांगले संस्कार होण्यासाठी अनेक जन हिताचे कार्यक्रम घडवून आणतात.त्याचाच भाग म्हणून देशपातळीवर  देव, देश व धर्म कार्यासाठी वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती,

संस्था व घटकांना प्रेरणा देण्या साठी संप्रदायातर्फे दर वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे शाखे तर्फे  गुरू पौर्णिमा तसेच नवनाथ यांच्या नावाने पुरस्कार देवून कार्याला प्रेरणा देण्याचे कार्य गेली अनेक वर्षे केले जाते. असे सद्गुरू भाऊ महाराज यांनी संबोधले.

Post a Comment

0 Comments