केव्हीके कार्यशाळेचे पुण्यात आयोजन; धानुका अॅग्रीटेकचा पुढाकार

पीपीपी अंतर्गत आयसीएआर-अटारी आणि धानुका ॲग्रीटेक यांचा संयुक्त उपक्रम


पुणे : पुणे कृषि महाविद्यालय येथे सोमवार २९ जुलै रोजी आयोजित कृषि विज्ञान केंद्र कार्यशाळेच्या मुहूर्तावर कृषिक्षेत्रात विकसित नवीन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविण्यासाठी विविध सरकारी यंत्रणा आणि खाजगी सहभागी  धानुका अॅग्रिटेक लिमिटेड यांनी एकत्रितपणे चालविलेल्या प्रयत्नांतील नवा अध्याय सुरू झाला आहे.

हे प्रयत्न देशभरात आणि विशेषत: आयसीएआर-अटारी  ( ICAR-Agricultural Technology Application Research Institute) च्या विभाग ८ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र गोवा आणि गुजरात यांचा या विभाग ८ मध्ये समावेश आहे.

या कार्यशाळेत ‘प्रगत कृषि तंत्रज्ञान अति दुर्गम गावांपर्यंत पोचवून आणि वापरात आणून  शेती करण्याच्या पद्धतींत क्रांतिकारी बदल करत कृषिक्षेत्राची शाश्वत वृद्धी घडवून आणणे’ या उद्दिष्टावर भर देण्यात आला. कृषिक्षेत्रात नवकल्पनांचा आविष्कार आणि विकास यांना चालना देण्यात सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीची ताकद आणि क्षमता यांचे दर्शन घडले. या कार्यशाळेसाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि संबंधित विषयांचे ज्ञान आणि सर्वोत्तम कार्यपद्धती यांचे आदान प्रदान होऊन भविष्यात सहकार्य आणि क्षमतेचा एकत्रित वापर वाढवण्यासाठीचा मार्ग खुला झाला.  

संशोधन संस्था आणि शेतकरी यांच्यातील अंतर कमी करून शाश्वत कृषिपद्धती आणि प्रभावी तंत्रज्ञान दुर्गम अतीदुर्गम भागांत पोचविण्याच्या प्रक्रियेतील  कृषि विज्ञान केंद्रांची भूमिका अधोरेखित झाली.

उपस्थित मान्यवर प्रतिनिधी: डॉ. पी जी पाटील ( कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ) हे या कार्यशाळेचे  प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये  डॉ.संजय भावे (  कुलगुरू, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ )  डॉ. इंद्र मणी (  कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा  कृषि विद्यापीठ ); डॉ.शरद गडाख (  कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ )  आणि डॉ. के बी कथिरिया ( कुलगुरू,  कृषि विद्यापीठ ) यांचा समावेश होता. कार्यशाळेसाठी डॉ. कौशिक बॅनर्जी (संचालक,  NRCG) डॉ. वाय जी प्रसाद ( संचालक CICR) डॉ. आर ए मराठे  संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र ) डॉ.  मनीष दास, ICAR-DMAPR, डॉ. दिलीप घोष ( संचालक Central Citrus Research Institute), डॉ. बर्मन (अतिरिक्त संचालक, ICAR) आणि डॉ. एस के रॉय ( संचालक  ATARI विभाग ८ )  हे  विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.

त्यांचे मौल्यवान चिंतन आणि तज्ज्ञ कौशल्य यामुळे शेती क्षेत्रातील सध्याच्या आव्हाने आणि संधी यांबद्दलची सर्वंकष समज उपलब्ध झाली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर तसेच कल्पक कृषि तंत्रांचे महत्त्व सहभागी प्रतिनिधींना समजले.  

उद्दिष्ट: शेतकरी, कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व संबंधितांना सर्वोत्तम उपलब्ध कृषि तंत्रज्ञान माहीत करून देणे हे या कार्यशाळेचे मूळ उद्दिष्ट होते. उत्पादन, उत्पादकता आणि शेतक-यांना मिळणारे उत्पन्न यात मोठी वाढ हे लक्ष्य आहे. हा प्रयत्न महत्त्वाचा आहे कारण भारतात ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकरी त्यावर अवलंबून आहेत. ही संख्या फारच मोठी असल्यामुळे कोणत्याही  एका विभागाने किंवा संस्थेने करण्याच्या दृष्टीने हे काम प्रचंड मोठे आहे आणि म्हणूनच त्यासाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्र येण्याची गरज आहे.  

सरकारी – खाजगी भागीदारी: कृषि क्षेत्रासमोरील आव्हानांची व्याप्ती पाहता त्यासाठी सरकारी आणि खाजगी संस्थांनी भागीदारीत काम करण्याला सरकारने उत्तेजन देणे महत्वाचे आहे. अशा सहकार्याने निधि, साधंनसमग्री, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि नव्या कल्पना हे सारे एकत्र आणणे शक्य होते आणि कृषि विस्तार सेवांची व्याप्ती आणि प्रभाव वाढणे सुलभ होते.

डॉ. आर जी अगरवाल, अध्यक्ष, धनुका उद्योगसमूह : पत्रकार परिषदेत डॉ. आर जी अगरवाल यांनी अद्ययावत तंत्रज्ञान – जसे की माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्ज, प्रिसीजन अॅग्रिकल्चर, ड्रोन – भारतीय कृषि क्षेत्रात तातडीने अंतर्भूत करण्याच्या गरजेवर भर दिला. भारतातील ६.५ लाख गावे आणि १४ कोटी शेतकरी यांच्यापर्यंत हे नवे तंत्रज्ञान पोचविण्याच्या कामी सरकारी – खाजगी भागीदारी चे महत्त्व डॉ. अगरवाल यांनी विषद केले.

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पीक उत्पादकतेत वाढ हे साधण्यासाठी सध्याच्या सिंचनपद्धती कडून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतींचा वापर करण्यावर डॉ. अगरवाल यांनी भर दिला. शेतक-यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठ आणि साठवण पद्धतीत तसेच शीतगृह व्यवस्थापन यांत सुधारणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.  

बनावट कीटकनाशकांच्या प्रश्नावर प्रभावी तोडगा म्हणून उच्च गुणवत्तेचे कीटकनाशक आणि आणि कृषि साहित्य उपलब्ध करून देण्याचा डॉ. अगरवाल यांनी पुरस्कार केला. अप्रामाणिक व्यापा-यांना चाप लावण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने चालविलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून त्यांनी बनावट किंवा चोरटी आयात करून पुरविलेल्या कृषि साहित्यापासून शेतक-यांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कायदा असावा असे सुचविले.  

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे झालेल्या संशोधन चाचण्यांचा उल्लेख करून डॉ अगरवाल म्हणाले की या चाचण्यांमध्ये धनुका तंत्रज्ञानाच्या वापरातून भुईमूग उत्पादनात 81 टक्के तर सोयाबीन उत्पादनात 17 टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. धानुका समूहाचे 1500 कर्मचारी नवीन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत आहेत. यासाठी कृषि विज्ञान केंद्रांमधील शास्त्रज्ञांचे सहकारी घेतले जात आहे तसेच युवा स्व्ययंसेवकांची “कृषि मित्र” म्हणून नेमणूक करून त्यांना कृषिक्षेत्रातील नव्या संशोधनाची माहिती प्रसृत करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.  

डॉ. पी जी पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी: प्रमुख अतिथि डॉ. पी जी पाटील  यांनी धनुका समुहाने नवे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत नेण्यासाठी भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या सहकार्याने हाती घेतलेल्या प्रयत्नाची प्रशंसा केली. कृषिक्षेत्राची प्रगति आणि टिकाऊ वृद्धी यासाठी खाजगी क्षेत्राचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.  

डॉ. एस के रॉय ( संचालक  ATARI विभाग ८ ): तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या कमी कृषि विज्ञान केंद्रांचे स्थान महत्वपूर्ण असल्याचे डॉ. एस के रॉय  यांनी नमूद केले. अशा कार्यशाळा आणि शेतकरी तसेच  कृषि विज्ञान केंद्रांमधील शास्त्रज्ञांना प्रत्यक्ष क्षेत्रात प्रशिक्षण यात खाजगी संस्थांचे सहकारी घेऊन देशाला विश्वाचे धान्य कोठार म्हणून विकसित करण्यासाठी आणि शेतक-यांच्या अभ्युदयासाठी प्रयत्न करण्याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.  

सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित अन्य कुलगुरूंनीही धानुका समूहाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि कृषि क्षेत्राच्या प्रगतीसाठी सरकार – खाजगी क्षेत्र यांच्या एकत्रित कार्याचे महत्व संगितले. भारतीय कृषि संशोधन परिषद ICAR अंतर्गत विविध संस्थांच्या संचालकानी (द्राक्ष, डाळिंब, कांदा लसूण, कापूस, औषधी वनस्पती इ. ची संचालनालये) विविध पिकांसाठीच्या कृषि पद्धतींत सुधारणा घडविण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपआपल्या संचालयाने केलेल्या कृषिक्षेत्र विषयक कार्याची माहिती दिली. 

Post a Comment

0 Comments