क्रेडाई महाराष्ट्र युथ विंगच्या वतीने दुसरी ‘महा युथ कॉनक्लेव्ह २०२४’ संपन्न


पुणे :
बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय दर्जाची संघटना असलेल्या क्रेडाईच्या महाराष्ट्र विभाग युथ विंगच्या वतीने नुकत्याच १५ व १६ जून रोजी ‘महा युथ कॉनक्लेव्ह २०२४’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांतून एकदा संपन्न होणाऱ्या या परिषदेचे हे सलग दुसरे वर्ष असून सदर परिषद हॉटेल कॉनराड बाय हिल्टन या ठिकाणी संपन्न झाली.

परिषदेचे उद्घाटन क्रेडाई राष्ट्रीयचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या कुमार गेरा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष सुनील फुर्दे, क्रेडाई महाराष्ट्रचे मानद सचिव विद्यानंद बेडेकर, क्रेडाई महाराष्ट्रच्या युथ विंगचे समन्वयक संकेत तुपे, क्रेडाई राष्ट्रीयच्या युथ विंगचे अध्यक्ष गौरव ठक्केर, क्रेडाई राष्ट्रीयच्या युथ विंगचे सचिव निलेश वोहरा, क्रेडाई महाराष्ट्रचे  उपाध्यक्ष रसिक चौहान, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आदित्य जावडेकर, क्रेडाई महाराष्ट्रचे सहसचिव आशिष पोखरना, धर्मवीर भारती, शांताराम पाटील आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.        

या परिषदेविषयी बोलताना बोलताना प्रमोद खैरनार म्हणाले, “द्विवार्षिक महा युथ कॉनक्लेव्ह या परिषदेची ही दुसरी आवृत्ती आहे. युवा विंगच्या सदस्यांना बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील नैतिक व्यवसाय पद्धतींबद्दल मार्गदर्शन करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्राचा विचार करीत आपण अशा पद्धतीच्या परिषदेचे आयोजन केले पाहिजे असे मला वाटते. यामुळे टिअर १, २ आणि ३ शहरातील युवा बांधकाम व्यावसायिकांना परस्पर संवाद साधण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या व्यवसायिक शिक्षणाला देखील चालना मिळेल.”

रणजीत नाईकनवरे म्हणाले, “महा युथ कॉन्क्लेव्ह २०२४ हे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील तरुण उद्योजकांना या व्यवसायासंदर्भात योग्य शिक्षण देण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे मला वाटते. या परिषदेच्या दुसऱ्या वर्षी देखील पुणे या शहराला यजमान शहर म्हणून निवडण्यात आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील सर्वच बांधकाम विकसक हे पुणे शहराकडे रिअल इस्टेट हब म्हणून पाहतात.

इतकेच नव्हे तर, पुणे शहरातील बांधकाम व्यवसायाप्रमाणे आपल्या भागातील व्यवसाय देखील कशा पद्धतीने यशस्वी करता येईल याचा अंदाजही त्यांना घेता येतो. याबरोबरच गेल्या वर्षी पुणे विभागाने देशात सर्वाधिक सदनिकांची विक्री केल्याने पुण्यात गेल्या काही वर्षांत जलद गतीने वाढत असलेले बांधकाम व्यवसाय क्षेत्र आणि त्याची कारणेही जाणून घेण्याची संधी या परिषदेदरम्यान सहभागी व्यवसायिकांना मिळते, असे मला वाटते.”

दोन दिवसीय कॉन्क्लेव्हमध्ये अनेक नामवंत वक्त्यांनी ‘सक्सेशन प्लॅनिंग – प्रिझर्व्हिंग लेगसी अँड नर्चरिंग नेक्स्ट जेन टॅलेंट’ , ‘बियाँड प्रॉपर्टी – मास्टरिंग लँड अँड रेव्हेन्यू स्ट्रटजीज्’, ‘कॉर्पोरेटायझेशन ; एन्हांसिंग इफिशियन्सी अँड ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन’, ‘सस्टेनबिलिटी अँड रिसायकलिंग ऑफ कन्सट्रक्शन मटेरिअल’, ‘अल्टरनेटिव्ह रिअल इस्टेट’, ‘बियाँड बजेटिंग- कॉस्ट ऑप्टिमायझेशन स्ट्रटजीज् इन कन्सट्रक्शन’, ‘द एव्ह्रीडे गाईड; लिव्हरजिंग कनेक्ट इफेक्टिव्हली फॉर पर्सनल बिझिनेस ग्रोथ’, ‘ब्रँड बिल्डींग मास्टर क्लास – बिल्ड युवर ब्रँड टू बिल्ड युवर प्रॉफिट’ , ‘सेल्स मास्टरक्लास – पाथवे टू ग्रो बिझिनेस १० एक्स’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

क्रेडाई महाराष्ट्र युथ विंगने आजवर राबविलेल्या केलेल्या उपक्रमांचा समावेश असलेल्या ‘होरायझन’ या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर, राष्ट्रीय क्रेडाईच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाले. या परिषदेमध्ये २५ ते ४० वयोगटातील ३० हून अधिक शहरांमधील २५० युथ विंग सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला.

युथ विंगचे समन्वयक संकेत तुपे हे सदर परिषदेचे निमंत्रक देखील होते. त्यांना सह निमंत्रक म्हणून प्रतिक भद्रा, नंदकिशोर पाटील, व्यासराज जांबगी, साहिल प्रभाळे, पियुष देसले, पंकज कासट आणि धवल इंगळे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments