`आयुशक्ती`ने पुणे शहरात सुरू केले दुसरे क्लिनिक


पुणे : जगातील प्रमुख आयुर्वेदिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या आयुशक्तीने पुण्यात आपले दुसरे आऊटलेट सुरू केले आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या आपल्या पहिल्या पुण्यातील आयुशक्ती क्लिनिक प्रचंड यशानंतर कंपनीने मुंढव्यातील मगरपट्टा सिटीजवळ,एट्रिअम बिझनेस कॉम्प्लेक्स येथे नवीन आऊटलेट सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन फ्रेन्चाइसी ओनर  डॉ. वैशाली शिंपी आणि शशिकांत शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी अन्य मान्यवरही उपस्थित होते.

नवीन आउटलेट देखील सेवा आणि उपचार प्रदान करेल. यामध्ये पंचकर्म, स्टीम, मसाज, डिटॉक्सिफिकेशन उपचार, सखोल नाडी वाचन, प्रभावी हर्बल उपाय, व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य आहार योजना, मार्मा (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट) तंत्र इत्यादींचा समावेश आहे.नवीन आउटलेट देखील पूर्वीच्या सेवा आणि उपचार प्रदान करेल. यामध्ये पंचकर्म, स्टीम, मसाज, डिटॉक्सिफिकेशन उपचार, नाड़ी परिक्षण, प्रभावी हर्बल उपाय, व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य आहार योजना, मर्म (आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट) तंत्र इत्यादींचा समावेश आहे.

भारत आणि जगातील इतर भागांतील आपल्या सर्व आऊटलेटमध्ये एकसमान उपचार उपलब्ध व्हाव्यात, याची हमी आयुशक्ती देते. त्यासाठी ती नियमितपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. पाथ (प्रॅक्टिशनर ट्रेनिंग इन अॅनसिएंट हिलिंग सिक्रेट्स ऑफ सिद्ध-वेद) या आपल्या ३ वर्षांच्या उपचार अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष तिने नुकतेच पूर्ण केले

या उद्घाटनप्रसंगी कंपनीच्या सह-संस्थापिका डॉ. स्मिता पंकज नरम म्हणाल्या, “पुणे शहरात आणि येथील लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत.  पर्यायी आरोग्य उपायांसाठी मोठी मागणी असल्याचे जाणवल्यामुळे पुणे शहरात आम्ही गेल्या वर्षी प्रवेश केला. सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पाहता आमच्या विस्ताराच्या योजनांवर आम्ही समर्पितरीत्या काम करत आहोत.

आमचे ध्येय आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे ग्राहक, भागीदार, डॉक्टर, आणि सर्व टीम देत असलेल्या अमूल्य आधाराबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत कृतज्ञ आहोत,” असे त्या पुढे म्हणाल्या.

हे आयुशक्तीचे महाराष्ट्रातील २५ वे क्लिनिक आहे.  या फ्रँचाईझीमध्ये ४ उपचार कक्ष, २ तपासणी दालन, एक पँट्री आणि एक ऐसपैस प्रतीक्षा कक्ष आहे. सामूहिक आरोग्यामध्ये दीर्घकालीन आमूलाग्र परिवर्तन घडविण्याचे व्रत घेऊन १९८७ मध्ये आयुशक्तीची स्थापना झाली होती. निष्णात हीलर स्व. डॉ. पंकज नरम आणि त्यांची पत्नी डॉ. स्मिता नरम यांनी एकत्रपणे त्यांची स्थापना केली होती. 

Post a Comment

0 Comments