व्हॉट्सअॅप बिझनेससाठी केली घोषणा
या घोषणेबाबत बोलतानाटाटा टेलिसर्व्हिसेसचे उपाध्यक्ष श्री. मन्नू सिंग म्हणाले की, “टीटीबीएस अद्ययावत ग्राहक सहभाग धोरणे, त्यांच्यासाठी नवनवीन सुलभ उपाययोजना आणणे याद्वारेउद्योगांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे.
आमच्या टोलमुक्त सेवा आणि व्हॉट्सअॅप बिझनेस क्षमतांना एकल एकत्रित व्यासपीठांशी जोडून आम्ही व्यवसायांना अधिक वैयक्तिक, सहज आणि कार्यक्षम ग्राहक सेवा देण्यास मदत करण्याचे ध्येय समोर ठेवतो. आमच्या मते ही नावीन्यपूर्ण उपाययोजना उद्योग आपल्या ग्राहकांशी कशा रितीने बांधले जातात त्यात आमूलाग्र बदल घडवेल आणि जास्त चांगले संबंध प्रस्थापित करून व्यवसायाला यश मिळवून देईल."
टीटीबीएस टोलफ्री आणि व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म यांच्यासाठी सिंगल नंबर आल्यामुळे उद्योगांना आपल्या ग्राहक सेवा सुयोग्य करणे, मार्केटिंग कॅम्पेन चालवणे आणि विविध माध्यमांद्वारे ब्रँडचे अस्तित्त्व मजबूत करणे शक्य होईल. त्यातील महत्त्वाचे फायदे म्हणजे एकात्मिक ग्राहक अनुभव, उद्योगांना आता आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगली पोहोच आणि एकात्मिक अनुभव देता येईल कारण ग्राहक आपल्या प्राधान्याच्या संवाद प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायांपर्यंत पोहोचू शकतील.
ग्राहकांसोबतच्या संवादात बदल: सिंगल नंबर वैशिष्ट्यामुळे उद्योगांना आपले संवाद आणि प्रतिसाद एकात्मिक करणे शक्य होईल. मॉनिटरिंगसाठीच्या या केंद्रीय प्लॅटफॉर्ममुळे व्यवसायांना ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे, अभिप्राय देणे आणि सपोर्ट विनंती रिअल टाइम तत्त्वावर पूर्ण करणे शक्य होईल. कमी खर्चिक उपाय: या एकात्मिक उपाययोजनेमुळे टोलफ्री आणि व्हॉट्सअॅप बिझनेस सेवांसाठी वेगवेगळे काँटॅक्ट क्रमांक ठेवण्याची गरज उरणार नाही. या एकत्रीकरणामुळे कार्यान्वयन खर्च कमी होईल आणि कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे उद्योगांच्या खर्चात मोठी बचत होऊ शकेल.
अॅनालिटिक्स आणि माहिती: या एकत्रित उपाययोजनेत सुयोग्य अॅनालिटिक्स आणि रिपोर्टिंग वैशिष्टयांचा समावेश आहे. त्यामुळे उद्योगांना ग्राहकांचे वर्तन आणि प्राधान्य याबाबत मौल्यवान माहिती मिळू शकते. बिझनेस या माहितीचा वापर माहितीकेंद्रीत निर्णय घेण्यासाठी, सेवा सुधारण्यासाठी आणि आपल्या ग्राहक सहभाग धोरणात सुयोग्यता आणण्यासाठी वापरू शकतात.
अद्ययावत तंत्रज्ञान आणि अद्वितीय ग्राहक सेवा देण्यावर भर देत असताना टीटीबीएस बिझनेस डिजिटली टिकण्यासाठी डिजिटल फर्स्ट वातावरण तयार करत आहे. यासाठी टीटीबीएसने अलीकडील काळात अनेक बाबतीत पुढाकार घेतला आहे. त्याद्वारे बिझनेसना नावीन्यपूर्ण आणि विश्वासू उपाययोजना दिल्या जातात व त्यांना लवचिक, स्केलेबल आणि सुरक्षित पद्धतीने आपले काम करणे शक्य होते.
कंपनीच्या स्मार्ट बिझनेस सोल्यूशन्स पोर्टफोलिओमध्येस्मार्टफ्लो सीसीएएससूट, हा ओम्नी चॅनल क्षमतांनी युक्त अद्ययावत क्लाऊड संवाद सूट आहे, स्मार्ट ऑफिसहा वन बॉक्स स्टार्ट अप किट विथ व्हॉइस, डेटा, अॅप्स, स्टोअरेज आणि इतर अनेक गोष्टींसह किट, स्मार्ट इंटरनेटलीज्ड लाइन अंतर्गत क्लाऊड सिक्युरिटीसह, एसडी-वान आयएफएलएक्स ही एक अत्यंत बुद्धिमान लवचिक उपाययोजना आहे, जी नेटवर्क ऑप्टिमायझेशनससाठी उपयुक्त आहे आणि सायबर सिक्युरिटी उपाययोजनांचा एकत्रित सूट आहे.
0 Comments