सीताराम जिंदाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

 निसर्गोपचार आणि सेवाभावी कामांत उत्कृष्ट योगदानाबद्दल झाला सन्मान


बेंगळुरू : सेवाभावी काम व आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व डॉ. सीताराम जिंदाल यांना प्रतिष्ठेचा पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला आहे. अद्वितीय सेवाभावी प्रयत्नांमधील डॉ. जिंदाल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

विशेषत: निसर्गोपचार (नेचरक्युअर) क्षेत्रातील त्यांचे योगदान असामान्य आहे. औषधांविना उपचार करणाऱ्या या उपचारपद्धतीत डॉ. जिंदाल यांनी चाकोरीबाह्य योगदान दिले आहे. जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटची स्थापना त्यांनी केली असून, या कामासाठीच त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला आहे. 

हरयाणातील नलवा या दुर्गम खेड्यात १९३२ साली जन्मलेल्या डॉ. जिंदाल यांच्या निसर्गोपचाराकडील प्रवास विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच सुरू झाला. या काळात त्यांना पोटातील क्षयरोगाचा (अॅबडॉमिनल ट्युबरक्युलॉसिस) सामना करावा लागला. त्यांचा आजार बरा होण्याजोगाच नाही असे वाटत असताना त्यांनी एका छोट्या निसर्गोपचार केंद्राचा आसरा घेतला.

उपवास, एनिमा आणि अन्य अपारंपरिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून त्यांना खूपच दिलासा मिळाला. या रूपांतरणात्मक अनुभवामुळे त्यांच्यात निसर्गोपचार व योग यांबद्दल अविचल विश्वास निर्माण झाला. 

एक सर्वसमावेशक निसर्गोपचार व योग रुग्णालय स्थापन करण्याच्या इच्छेतून डॉ. जिंदाल यांनी १९७७-७९ या काळात बेंगळुरू शहराबाहेर मोठी जमीन घेतली. त्यातूनच जेएनआयची स्थापना झाली. जेएनआयमध्ये एक सुसज्ज संशोधन विभाग होता आणि जिंदाल अॅल्युमिनिअम लिमिटेडद्वारे (जेएएल) या विभागाला सढळ हस्ते निधी पुरवला जाऊ लागला. निसर्गोपचाराला एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याप्रती डॉ. जिंदाल यांची बांधिलकी यातून दिसून येते. 

त्या काळात प्रचलित असलेल्या पारंपरिक निसर्गोपचार पद्धतींहून पूर्णपणे वेगळ्या मार्गाने जात, या विज्ञानाला आधुनिक स्वरूप देण्याच्या, त्यात नवोन्मेष आणण्याच्या उद्दिष्टाने डॉ. जिंदाल यांनी काम सुरू केले. पारंपरिक निसर्गोपचार पद्धतींमधील उत्साहाचा व विकासाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी औषधविरहित पद्धती अधिक प्रगत करण्यासाठी तसेच त्याच्या प्रसारासाठी वाहून घेतले. १९६९ मध्ये स्थापन झालेली एसजे फाउंडेशन ही संस्था त्यांच्या सेवाभावी उपक्रमांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली. त्यांनी हे सर्व काम पूर्णपणे जेएएलच्या पाठबळावर केले. सरकार किंवा अन्य व्यक्तींकडून कोणतीही मदत मागितली नाही. 

डॉ. जिंदाल यांच्या अविश्रांत प्रयत्नांचा लक्षणीय प्रभाव औषधविरहित उपचारांच्या क्षेत्रावर पडला. जेएनआय हे एक जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून प्रस्थापित झाले. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, संधिवात अशा विविध आजारांवर यशस्वीरित्या उपचार करणारे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. कॅन्सरच्या रुग्णांवरही केंद्रामध्ये उपचार केले जाऊ लागले. या संस्थेत आता ५५० बेड्स आहेत आणि व्याधींवर औषधविरहित उपचार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही संस्था आशेचा किरण पुरवत आहे. 

जेएनआयशिवाय डॉ. जिंदाल यांनी असंख्य सेवभावी उपक्रम राबवले. यातून सामाजिक सुधारणेप्रती त्यांची बांधिलकी दिसून येते. अॅलोपथी रुग्णालये, शाळा व महाविद्यालयांची स्थापना, ग्रामीण विकासाचे उपक्रम, आरोग्यसेवा व शिक्षणाच्या दृष्टीने गावे दत्तक घेणे आणि आरोग्यसेवा व शिक्षण या क्षेत्रांमध्ये अविश्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मदत करणे या स्वरूपाचे विपुल काम त्यांनी केले आहे. 

डॉ. जिंदाल यांचे सेवाभावी उपक्रम निसर्गोपचारांच्या पलीकडे जाणारे आहेत. त्यांनी नलवा या त्यांच्या मूळगावात आठ सेवाभावी उपक्रमांची स्थापना केली आहे. याचा लाभ या परिसरातील मोठ्या लोकसंख्येला होत आहे. वंचित समुदायांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींच्या माध्यमातून मदत करणे तसेच आरोग्यसेवा व शिक्षण यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक मदत देणे यांतून त्यांचे सामाजिक कल्याणाप्रती असलेले समर्पण दिसून येते. 

डॉ. जिंदाल यांच्या कामाचा प्रभाव जेएनआयच्या पलीकडेही जाणवतो. आरोग्याकडे बघण्याचा त्यांचा सर्वांगीण दृष्टिकोन, निसर्गोपचार व योगावर भर देणे यांमुळे जगभरातील लक्षावधी लोकांच्या आयुष्यांमध्ये परिवर्तन घडून आले आहे. प्रतिबंधात्मक उपायांप्रती तसेच औषधांच्या साइड-इफेक्ट्सबद्दल जागरूकता निर्माण करण्याप्रती त्यांची बांधिलकी, निसर्गोपचार अॅलोपॅथिक रुग्णांवरील ताण लक्षणीयरित्या कमी करू शकतो या त्यांच्या विश्वासाशी संलग्न आहे. 

या संपूर्ण प्रवासात डॉ. जिंदाल यांनी असंख्य नवोन्मेष्कारी उत्पादने आणि उपचारपद्धती विकसित केल्या. अनेक आजारांवर ते गुणकारी ठरत आहेत. सुलभ अॅबडोमेन पॅक्सपासून हर्बल चहांपर्यंत, स्पायनल बाथ टब्ज, थंड व उष्ण रिफ्लेक्सॉलॉडजी ट्रॅक्सपर्यंत अनेक नवोन्मेष्कारी उत्पादने त्यांनी विकसित केली आहेत. त्यांच्या योगदानामुळे निसर्गोपचाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. 

डॉ. जिंदाल यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाची आणि अफाट योगदानाची दखल अनेक महान व्यक्तींनी घेतली आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवेगौडा हे माजी पंतप्रधान, माजी उपपंतप्रधान देवीलाल आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा समावेश होतो. 

समाजाच्या कल्याणासाठी डॉ. जिंदाल यांनी केलेले अविश्रांत प्रयत्न हे आरोग्यसेवेच्या पलीकडील आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) या संकल्पनेचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. उद्योजकांनी त्यांच्या नफ्याचा काही भाग दारिद्र्य निर्मूलनाच्या कामासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले. उद्योगांसाठी निश्चित करून दिलेली सीएसआरची टक्केवारी वाढवण्यासाठी अद्याप ते सरकारसोबत संघर्ष करत आहेत. यातून समाजाच्या कल्याणाप्रती त्यांची अविचल बांधिलकी दिसून येते. 

डॉ. सीताराम जिंदाल यांचे आयुष्य व कार्य म्हणजे व्यावसायिक यश व मानवतेच्या अनुकंपायुक्त सेवेचा सौहार्दपूर्ण संयोग आहे. निसर्गोपचार व सेवाभावी कामातील समर्पणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसेवा व सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रांवर कधीही पुसला न जाणारा ठसा उमटवला आहे. म्हणूनच ते पद्मभूषण सन्मानाचे पात्र मानकरी ठरले आहेत. 

Post a Comment

0 Comments