पुणे : सहकारी संस्थांना अपस्किल व सक्षम करण्याचे टास्क देण्यात आलेल्या नॅशनल कौन्सिल फॉर को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंग (एनसीसीटी) ने आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान देशभरात ३,२८७ प्रशिक्षण उपक्रम राबवले, जेथे या उपक्रमाने ८८ टक्क्यांच्या वाढीसह १,७४० प्रशिक्षणाचे लक्ष्य पार केले आहे.
विशेषत: १०९८८ अनुसूचित जाती महिला, १९४८५ अनुसूचित जमाती महिला आणि ३५६६३ सामान्य श्रेणीतील महिला अशा दुर्बल घटकातील महिलांसाठी प्रशिक्षण उपक्रमांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.
नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान संसदेत मांडण्यात आलेल्या एनसीसीटी वार्षिक अहवाल २०२२-२३ नुसार, यामुळे सहभागी संख्येत तब्बल ४६३ टक्के किंवा जवळपास पाचपट वाढ झाली, लक्ष्यित ४३,५०० सहभागींच्या तुलनेत २०१,५०७ सहभागी उपस्थित होते.
सहकार मंत्रालय, भारत सरकार द्वारे समर्थित स्वायत्त संस्था एनसीसीटी संपूर्ण भारतात उपस्थित असण्यासह सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सहकारी व्यवस्थापन आणि प्रशासन यावर लक्ष केंद्रित करून सहकारी प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे. २०२२-२३ हे वर्ष एनसीसीटीसाठी महत्त्वाचे ठरले आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली गेली, असे अहवालात म्हटले आहे.
''या अपवादात्मक कामगिरीमुळे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण व जागरूकता उपक्रमांची संख्या, प्रशिक्षण देण्यात आलेले सहभागी, नियोजित वेबिनार्स व सेमिनार्स यांची आकडेवारी, भारत सरकारच्या योजना, प्रोग्राम्स व नवीन उपक्रमांबाबत माहिती देणाऱ्या सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण यामध्ये वाढ झाली,'' असे अहवालात म्हटले आहे.
एनसीसीटीने बहुमूल्य चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी उल्लेखनीय ५६५ उच्च-स्तरीय वेबिनार, सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या. वर्षभरात १८.०७ कोटी रूपयांच्या विक्रमी अंतर्गत संसाधन महसूल प्राप्त झाला, ज्यामधून कौन्सिलची आर्थिक क्षमता व शाश्वतता दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे.
''या व्यापक कामगिरीनंतर देखील वर्षासाठी तात्पुरता खर्च ५५.०० कोटी रूपये होता, ज्यामधून आर्थिक वर्षाचे उत्तमरित्या व्यवस्थापन दिसून येते,'' असे अहवालात म्हटले आहे.
एनसीसीटीने देशभरातील सहकारी संस्था व सहकारी कर्मचाऱ्यांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी बारकाईने प्रशिक्षण उपक्रम डिझाइन केले आहेत. यामध्ये लाँग-टर्म पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स, लाँग-टर्म डिप्लेामा प्रोग्राम्स, शॉर्ट-टर्म प्रोग्राम्स आणि तीन ते पाच दिवसांचे प्रोग्राम्स यांचा समावेश आहे.
या अहवालाने 'अचीव्हमेंट्स अॅण्ड माइलस्टोन्स इन २०२२-२३'बाबत म्हटले आहे, ''२०२२-२३ मधील या अपवादात्मक निष्पत्तींमधून एनसीसीटीची आपल्या मिशनप्रती, तसेच राष्ट्रीय स्तरावर सहकारी प्रशिक्षण व जागरूकता वाढवण्यासाठी त्यांच्या अद्वितीय समर्पिततेप्रती कटिबद्धता दिसून येते.''
एनसीसीटी महिला दुग्ध सहकारी संस्था, हातमाग, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय क्षेत्र इत्यादींसाठी प्रक्रिया, विपणन या विषयावर सर्वोत्तम प्रशिक्षण उपक्रम प्रदान करते, तसेच एसएचजी सदस्यांसाठी उद्योजकता, सूक्ष्म क्रेडिट इत्यादींवर गरजेवर आधारित अल्पकालीन कोर्सेस/प्रोग्राम्स प्रदान करते.
0 Comments