मार्चपर्यंत जगभरात ३५० स्टोअर्सपर्यंत पोहोचण्याचे ध्येय
पुणे : मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही आघाडीची ज्वेलरी रिटेलर कंपनी जागतिक विस्तार धोरणानुसार दहा नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी सज्ज असून मार्चपर्यंत २५० नवीन स्टोअर्स उघडण्याचे त्यांचे ध्येय आहे. सध्या मलाबार ही कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वांत मोठी ज्वेलरी ग्रुप आहे आणि ती डेलॉइट लक्झरी गुड्स ग्लोबल रँकिंगमध्ये १९ व्या क्रमांकावर आहे.
भारतात उघडल्या जाणाऱ्या नवीन स्टोअर्समध्ये महाराष्ट्रातील लातूर, सातारा आणि नागपूर येथील स्टोअर्सचा, कर्नाटकातील कोलार आणि व्हाइटफील्ड, राजस्थानमध्ये जयपूर, दिल्लीतील चांदणी चौक, आंध्र प्रदेशातील वनस्थळीपुरम, पंजाबमधील पटियाला आणि पुदुच्चेरी येथील स्टोअर्सचा समावेश आहे. या द्वारे राजस्थान आणि पुदुच्चेरीमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने प्रथमच प्रवेश केला आहे आणि या राज्यांमध्ये ब्रँडचा विस्तार केला आहे. उर्वरित आठ स्टोअर्स या ब्रँडचे आधीच अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये उघडले जातील.
मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद म्हणाले की, “आम्ही मेक इन इंडिया मार्केट टू दि वर्ल्डची संकल्पना विकसित करून जागतिक पातळीवर उत्तम प्रगती साध्य केली आहे. ही कामगिरी फक्त आमच्यासाठीच नाही तर हा ब्रँड अस्तित्वात असलेल्या १४ देशांमधील दागिन्यांच्या चाहत्यांसाठीच प्रचंड आनंददायी आहे.
दहा नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी तयारी करत असताना आम्ही आमच्या सर्व मौल्यवान ग्राहक, टीम सदस्य आणि गुंतवणूकदारांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो कारण त्यांनी हे शक्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक उघडणाऱ्या नवीन स्टोअरसोबत आम्ही जगातील पहिल्या क्रमांकाचा ज्वेलरी आणि लक्झरी ब्रँड होण्याच्या आमच्या ध्येयाच्या आणखी जवळ जात आहोत.”
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स सध्या अस्तित्वात असलेल्या देशांबरोबरच न्यूझीलंड, इजिप्त, तुर्कस्थान आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही नवीन स्टोअर्स उघडून आंतरराष्ट्रीय विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रोजगाराच्या संधींच्या निर्मितीसाठी आणि कामासाठी उत्तम वातावरण देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मलाबार ग्रुपमध्ये सध्या विविध देश आणि वंशांचे २२,००० पेक्षा जास्त लोक काम करतात. या कंपनीचे उद्दिष्ट पुढील तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त मनुष्यबळ निर्मिती करून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आहे.
0 Comments