म्हैसूरच्या महाराजांच्या हस्ते सायकल प्युअर अगरबत्तीच्या संस्थापकांवरील पुस्तकाचे प्रकाशन


पुणे : म्हैसूरच्या राजघराण्याचे वंशज श्रीमंत श्री यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी सध्या सुरू असलेल्या दसरा उत्सवादरम्यान सायकल प्युअरचे संस्थापक श्री. एन. रंगा राव यांच्या वाढदिवसानिमित्त स्मरणार्थ आज एक पुस्तक आणि "दरबारी" या विशेष मर्यादित आवृत्तीच्या अगरबत्तीचे राजमहालात प्रकाशन केले.  

या विशेष प्रसंगी बोलताना श्रीमंत श्री यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार म्हणाले, "म्हैसूर अगरबतीच्या सुगंधाला आज जागतिक वैभव प्राप्त झाले आहे आणि या अगरबतीला जीआय टॅग देण्यात आला आहे.  दीर्घकाळापासून शाही दरबार, मंदिरे आणि आमच्या लोकांच्या घराची शोभा वाढविलेल्या, आमच्या संवेदनांना समृद्ध करणाऱ्या आणि आम्हाला परमात्म्याशी जोडणाऱ्या म्हैसूर अगरबतीच्या सुगंधांचा हा पुरावा आहे.

आपल्या परंपरांचा समृद्ध ताणा-बाणा जतन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून आम्ही आमचे संरक्षण मनःपूर्वक चालू ठेवू जेणेकरून या सुगंधी कला आमच्या लोकांसाठी प्रेरणा आणि अभिमानाचा स्रोत म्हणून कायम राहतील.."

"फ्रॉम म्हैसूर टू द वर्ल्ड" नावाच्या या पुस्तकात  भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्‍वभूमीवर आपला अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हैसूरची निवड केलेल्या आणि पुढे जाऊन एका जागतिक समूहाची स्थापना केली अशा तरुण, धाडसी उद्योजकाच्या असाधारण जीवनाचे वर्णन केले आहे. हे पुस्तक एन. रंगा राव यांचे ज्येष्ठ पुत्र आर. गुरु यांनी केलेल वर्णन आहे.  

एनआर ग्रुपचे अध्यक्ष आर. गुरू म्हणाले, माझ्या वडिलांमध्ये सामान्यांमध्ये असामान्य पाहण्याची विलक्षण क्षमता होती. ते एक प्रकारचे किमयागार होते, साध्या पदार्थांचे बारीक सुगंधात रूपांतर करू शकणारे एक उत्कृष्ट परफ्यूमर होते. व्यावसायिक कौशल्याची तीव्र जाणीव घेऊन ते जन्माला आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते दयाळू आणि प्रेमळ माणूस  होते ज्यांनी कौटुंबिक नातेसंबंधांना सर्वांत अधिक महत्त्व दिले. मला विश्वास आहे की त्यांची कथा पुढील पिढ्यांसाठी तरुण उद्योजकांना प्रेरणा देईल.

सायकल प्युअर अगरबतीचे एमडी श्री. अर्जुन रंगा म्हणाले की , १९५३ च्या दसऱ्याच्या वेळी, माझ्या आजोबांच्या अत्तर निर्मितीला सुवर्णपदक मिळाले. आज बरोबर ७० वर्षांनंतर, राजाजींच्या हस्ते त्यांच्याबद्दल एका पुस्तकाचे प्रकाशन होत आहे याबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे. त्यांच्या परफ्यूम निर्मितीच्या वारशासाठी ही एक शाही दाद आहे, असे आपण म्हणू शकता आणि आता तीन पिढ्यांनंतरही आम्ही तो पुढे जात आहोत. म्हैसूरमधून जगापर्यंत सर्वोत्कृष्ट सुगंध घेऊन जाताना आम्हाला नम्रता आणि सन्मान जाणवतो.

Post a Comment

0 Comments