पुणे : मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्जीबिशन सेंटरमध्ये ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विविध प्रकारच्या केकचे प्रदर्शन `केकॉलॉजी` चे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून या प्रदर्शनाचे रूपांतर विविधांगी केकच्या कन्फेक्शनरीच्या अद्भुत जगात होणार आहे. त्यामुळे केकप्रेमी नक्कीच हरखून जाणार आहेत.
देश-विदेशात ख्याती मिळविलेले केक कलावंत प्रत्यक्ष कार्यशाळा घेणार असून येथे उपस्थित असणाऱ्यांना आपले केक सजावटीचे कौशल्य परिपूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. बेकर्सविला एरेनामध्ये ३६ मोफत मिनी वर्कशॉप असणार आहेत. याशिवाय कलावंतांच्या केक आणि बेक यावरील २४ मोफत प्रात्यक्षिकांचे आकर्षण असेल. यात ते मंचावरून टीप आणि ट्रिक्स शेअर करतील.
केकॉलॉजी २०२३ मध्ये इतिहास जिवंत होणार असून फोर्डबाईट्स स्कूल ऑफ शुगर आर्टच्या शुभलक्ष्मी रामसिंग 'वीर - दि वॉर एलिफंट' साकार करणार आहेत. राजा पुरूने वीर हत्तीवर बसून केलेल्या झेलमच्या प्रसिद्ध लढाईचे यात चित्रण असणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगाला शानदार मानवंदना दिलेली पाहुण्यांना पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
केकॉलॉजीमध्ये एक नाही तर दोन प्रत्यक्ष चॅम्पियनशिप असणार आहेत. पहिली, ७ शुगरलेनच्या भागीदारीतील 'आउट ऑफ द बॉक्स चॅम्पियनशिप' मध्ये उपस्थितांना आश्चर्यचकित व्हायला मिळेल, कारण यातील सहभागींना थीम असलेला केक तयार करण्यासाठी केक सजवण्याच्या साहित्याने भरलेला एक मिस्ट्री बॉक्स दिला जाईल. दुसरी, व्हॅनहाउटेन प्रोफेशनल इंडियाच्या भागीदारीत रंगमंचावर 'चॉकलेट वॉर्स' उलगडेल, जिथे सहा संघ चॉकलेट-थीम असलेल्या निर्मितीसह एकमेकांशी स्पर्धा करतील.
केकॉलॉजीच्या संस्थापक खुशी मलानी म्हणाल्या की, आम्ही केकॉलॉजीचे सहावे वर्ष साजरे करत असताना, होम बेकर्स आणि विक्रेत्यांना सारखेच सक्षम करणारे व्यासपीठ तयार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. केकॉलॉजी हा केवळ एक कार्यक्रम नाही. हा सर्जनशीलता आणि सहयोगाला चालना देणारा एक समुदाय आहे. आम्ही मधुर सशक्तीकरणाचा हा प्रवास पुढे चालू ठेवण्यास उत्सुक आहोत.
यादरम्यान बेक हेवन कन्फेक्शनरीज यांच्या सहकार्याने सर्वात मोठी केक प्रदर्शन स्पर्धा असेल ही अभिमानाची बाब आहे. यात वेडिंग, स्कल्प्टेड, वन इयर वंडर, डेकोरेटिव्ह कप केक्स आणि हेल्दी ट्रिप्स या पाच वेगवेगळ्या गटांमध्ये २०० स्पर्धक सहभागी होतील. तसेच केक डेकोर रॉयल आयसिंग आर्ट यांच्यासह होणाऱ्या प्रमुख केक स्पर्धेत संपूर्ण भारतातील बारा कलावंत सहभागी होणार असून ‘एका दिवसात संपूर्ण जगभर’ या कल्पनेवरील लार्जर दॅन लाइफ केक ते बनवतील.
डिंकीडूडल डिझाईन्समागील सर्जनशील शक्ती असलेल्या डॉन बटलर यांनी केक बनवण्याच्या आपल्या छंदाचे रूपांतर वाढत्या व्यवसायात केले. त्यांनी वास्तववादी आणि एअरब्रश केकसाठी ख्याती मिळविली असून त्या खऱ्या अर्थाने प्रयोगशील आहेत. डिंकीडूडल एअरब्रश आणि केकफ्रेम यांसारख्या त्यांच्या शोधांनी जागतिक ख्याती मिळवली आहे. डॉन यांना २०१६ मध्ये केकमास्टर्स केक आर्टिस्ट ऑफ द इयरचा मान मिळाला होता.
यूकेमध्ये राहणाऱ्या एमिली हँकिन्स या त्यांच्या अनोख्या, हाताने रंगवलेल्या वेडिंग केकसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची कारकीर्द २०१२ मध्ये सुरू झाली आणि त्या आता यूकेच्या टॉप केक पेंटिंग तज्ञांपैकी एक आहेत. कोकोआ बटर पेंटने बनवलेले एमिलीचे सिग्नेचर ब्लूम्स लगेच ओळखता येतात.
विशेष ऑर्डरवरून वेडिंग केक तयार करण्याबरोबरच त्या जगभरात केक पेंटिंगचे क्लासेस घेतात आणि त्यांनी स्वतःचे ऑनलाइन कोकोआ बटर केक पेंटिंग मास्टरक्लास सुरू केले आहेत. केक मासिकांसाठी लेखन आणि 'डिझायनर केक डेकोरेटिंग' सह-लेखन यातही एमिलीचे योगदान आहे.
0 Comments