डाॅ. मनीषा जाधव व प्रीती पाटील यांचा पुढाकार; सुमारे ३२२ महिला-पुरुषांची झाली कर्करोग तपासणी
पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजप वैद्यकीय आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मनीषा जाधव आणि भाजप जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष प्रीती पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुडच्या जयाबाई सुतार हाॅस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून मोदी यांचा वाढदिवस रुग्णसेवा करून साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय आघाडी महिला संयोजक (आयुर्वेद विभाग) डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. बाळकृष्ण गायकवाड डॉ. राजू अंबड, डॉ. धर्मेंद्र शहा डॉ. अतुल देसाई, भाजप जैन युवा प्रकोष्ठ अध्यक्ष आयुष कांकरिया, महेंद्र कांकरिया, श्रुती मेहता, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे सहसंयोजक प्रणव मेहता,
भाजप कोथरूडचे अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका वासंती जाधव, अल्पना वरपे, श्रद्धाताई प्रभुणे, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडी संयोजक धनंजय दगडे पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष डाॅ. संदीप बुटाला यांचे विशेष सहकार्य लाभले.
या वेळी बोलताना संदीप भंडारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अशाप्रकारे रुग्णसेवा करून साजरा करण्यात येत असल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. डाॅ. मनीषा जाधव व प्रीती पाटील यांचा हा उपक्रम प्रशंसेस पात्र आहे.
या शिबिरात आलेल्या महिलांची गर्भाशय व ब्रेस्ट कॅन्सरची तसेच पुरुषांची मूख कर्करोगासंबंधी तपासणी करण्यात आली. याशिवाय कॅन्सरच्या चाचण्या फार खर्चिक असतात, त्यामुळे त्याबाबत टाळाटाळ केली जाते. परंतु या तपासण्या शिबिरात निःशुल्क करण्यात आल्या.
याशिवाय रुग्णांची रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, ब्रेस्ट स्क्रिनिंगमशीन द्वारे तपासणी, मॅमोग्राफी, गर्भाशय मूख तपासणी, कॅनडाती वेल स्कॅन मशीनद्वारे मूख तपासणी, ईसीजी, रक्तदाब अशा तपासण्या करण्यात आल्या. सुमारे ३२२ महिला-पुरुषांनी या शिबिरात आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
सूर्या सह्याद्री हॉस्पिटलची टीम, आॅन्कोसर्जन डॉक्टर भूषण भळगट, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रसन्न देशमुख, रेडिएशन ऑंकोलॉजिस्ट डॉ. जगदीश शेजवळ ओरल कॅन्सर स्क्रीनिंग तज्ञ डॉ. तृप्ती घोलप, लायन्स क्लबच्या संगीता शेजवळ, कॅन्सर तपासणी व्हॅन मधील डॉ. प्रेमलता यांचे या शिबिराला विशेष सहकार्य लाभले. सर्व डाॅक्टरांचा व शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
0 Comments