एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या स्कूल आॅफ इंजीनियरिंगतर्फे आयोजन
पुणे - संरक्षण क्षेत्राला आणखी अत्याधुनिक करणाऱ्या तंत्रज्ञानावर नुकताच एक परिसंवाद एमआयटी-एडीटी विद्यापीठाअंतर्गत संचालित एमआयटी स्कूल आॅफ इंजीनियरिंग अॅण्ड सायन्स महाविद्यालयात पार पडला. दि. ३ ते ४ आॅगस्टदरम्यान या महाविद्यालयाच्या एअरोस्पेस इंजीनियरिंग विभागाच्या वतीने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
परिसंवादाला बड्या शास्त्रज्ञांची होती उपस्थिती
आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन भारतातील एरोस्पेस डोमेनची सर्वात मोठी सोसायटी असलेल्या एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने केले होते. या सोसायटीची स्थापना 27 डिसेंबर 1948 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एरोनॉटिकल आणि एरोस्पेस विज्ञान/तंत्रज्ञानाचा देशात प्रसार करण्याच्या उद्देशाने केली होती. DRDO आणि VSSC मधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 3 ऑगस्ट रोजी या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदा असा परिसंवाद आयोजित करण्यात आला ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी या परिसंवादात DRDO च्या भारतातील विविध प्रयोगशाळांचे संचालक आणि सहयोगी संचालक उपस्थित होते. शास्त्रज्ञ डीआरडीओचे संचालक व सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जगन्नाथ नायक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, एमआयटी एसओईएसचे डीन, संचालक तसेच एमआयटी एडीटीचे विभाग आणि संस्था प्रमुख कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित होते.
याशिवाय डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळेतील इतर अनेक उच्चस्तरीय प्रतिनिधींनी या उपक्रमात मार्गदर्शन दिले. यामध्ये प्रामुख्याने डीआरडीएचे संचालक आणि एईएसआय पुणे शाखेचे अध्यक्ष ए डॅश, व्हीएसएससीचे माजी गट संचालक डॉ. जीनू, माजी संचालक के.पी.एस. मूर्ती, शास्त्रज्ञ आनंदराजा ए हेमरल चे शास्त्रज्ञ ए. के. एल. भगत यांचा समावेश होता. एमआयटी-एडीटीकडून या परिसंवादाचे संयोजक आणि सहसंयोजक अनुक्रमे एअरोस्पेस विभागाचे एचओडी डॉ. सुनील व्ही डिंगरे आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. देवब्रत साहू उपस्थित होते.
या परिसंवादात डीआरडीओ लॅबमधील ४० शास्त्रज्ञांनीही हजेरी लावली. एमआयटी-एडीटीमध्ये शास्त्रज्ञांच्या एवढ्या मोठ्या मेळाव्याचे हे पहिले उदाहरण ठरले. प्रमुख पाहुणे डॉ. जगन्नाथ यांनी उपस्थितांना लेसर आणि रेडिएवेव्ह आधारित मासलेस शस्त्रे वापरून भूभागाचे रक्षण करण्यासाठी भारताच्या अलीकडील तंत्रज्ञानाबद्दल आणि डॉ. जीनू यांनी घन रॉकेट प्रणोदनाबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
अनेक शोधनिबंध परिसंवादातून आले समोर
या परिसंवादात 32 शोधनिबंध सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, मुख्य व्याख्यान ईटनचे तंत्रज्ञान व्यवस्थापक डॉ. सचिन उंबरकर यांनी केले आणि नंतर दोन निमंत्रित भाषणे आंतरराष्ट्रीय वक्त्यांनी दिली. एक ब्राझीलचे प्राध्यापक डॉ. इवो डेव्हिड आणि दुसरे संशोधक डॉ. मौरी ऑलिव्हेरिया (यूके) हे होते. दुबईचे प्रतिनिधी देखील या वेळी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या परिसंवादात सीओईपी पुणे, व्हीआयटी पुणे, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, एनएमआयटी बंगलोर, एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे इत्यादी देशभरातील विविध संस्थांमधील सहभागींनी मिळून 18 तांत्रिक अहवाल सादर केले.
कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. जिथे प्रत्येक श्रेणीतील (तोंडी आणि पोस्टर) 3 उत्कृष्ट पेपर्सना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी या अहवालांचे मूल्यांकन केले आहे.
हा कार्यक्रम भारत फोर्ज पुणे आणि अॅव्हेक्सटेक लिमिटेड दुबई यांनी प्रायोजित केला होता. आयोजकांच्या पुढील कार्यक्रमाची योजनांची माहिती प्रसिद्ध एरोमॉडेलर माधव खरे यांनी सर्वांसमोर ठेवली. एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्याने एईएसआय द्वारे नोव्हेंबर 2023 मध्ये रबर पाॅवर्ड एअरोप्लेनवर आयोजित करण्याची योजना या वेळी सांगण्यात आले.
0 Comments