शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये क्रांती घडवून आणण्याचे एसएफएचे ध्येय : सीओओ राजस जोशी
पुणे : भारतातील आघाडीचे टेक एनेबल्ड मल्टी- स्पोर्ट ग्रासरूट कॉम्पिटिशन प्लॅटफॉर्म असलेले स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) भारताच्या ग्रासरूट (तळागाळातील) स्पोर्टस इकोसिस्टीममध्ये क्रांती घडवून आणण्याच्या मोहिमेवर आहे. लहान मुलांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनासह एसएफए चॅम्पियनशिप २०२३ या वर्षात पुण्यात दुसऱ्या सत्रासाठी परत येत आहे, अशी माहिती स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए)चे सीओओ राजस जोशी यांनी दिली.
स्पोर्ट्स फाॅर आॅलच्या नव्या स्पर्धांविषयी माहिती देण्यासाठी आयोजित एका पत्रकार परिषदेत राजस जोशी यांनी सांगितले की, एसएफए चॅम्पियनशिप्स या भारतातील सर्वात मोठ्या शालेय पातळीवरील मल्टी स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असून ऑलिम्पिक-स्तरावरील खेळासारखा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत तरुण क्रीडापटूंमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात. २०१५ मध्ये सुरुवात झाल्यापासून एसएफएने १२ एसएफए चॅम्पियनशिपच्या माध्यमातून २००,००० क्रीडापटूंसाठी टेक आईपी कौशल्य सक्षम केले आहे.
पुण्याबद्दल बोलायचे तर २०२२ च्या पदार्पणाच्या सत्रात पुण्यात ५०० हून अधिक शाळांमधील ८,००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बालेवाडीस्थित पीआयसीटी मॉडेल स्कूल ५३ पदकांसह खेळासाठी पुण्यातील आघाडीची शाळा म्हणून उदयास आली. फुटबॉल आणि अॅथलेटिक्स हे खेळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पर्याय असल्याचे दिसून आले. खरेतर शहराच्या स्पोर्टस इकोसिस्टीममध्ये महिलांच्या सहभागामध्ये सातत्याने वाढ होत आहे. एसएफए चॅम्पियनशिपमधील खेळाडूंच्या संख्येपैकी ३०% खेळाडू मुली होत्या.
राजस जोशी पुढे म्हणाले, "आम्ही ग्रासरूट पातळीवर देशाच्या क्रीडा संस्कृतीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि युवा खेळाडूंना शक्य तितके खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करून स्पोर्ट्स डीएनए वाढविण्याची आमची बांधिलकी मजबूत करत आहोत. आमचे वैशिष्ट्यपूर्ण चॅम्पियनशिप प्लॅटफॉर्म तरुणांना ऑलिम्पिक-शैलीतील स्पर्धेची झलक पाहण्यास सक्षम करते. आम्ही इकोसिस्टमच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याच्या दिशेने काम करत असून देशाची जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळविण्याच्या आकांक्षेची आम्हाला जाणीव आहे.”
तरुण खेळाडूंना सहभागी होण्यासाठी आणि अनेक खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता एसएफएतर्फे ज्या खेळाडूंनी मल्टी स्पोर्ट्स मध्ये एकापेक्षा जास्त पदके (विशेषकरून सुवर्ण) जिंकली आहेत त्यांना 'गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल' म्हणून गौरविले जाते. २०२२ मध्ये, पीआयसीटी मॉडेल स्कूलच्या जैनम सिंघवी आणि राजलक्ष्मी चव्हाण यांना एसएफए गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल म्हणून गौरविण्यात आले. या दोघांनीही अॅथलेटिक्स आणि फुटबॉलमध्ये प्रत्येकी २ पदके जिंकून जबरदस्त कामगिरी केली होती.
२०१५ पासून एसएफएने मुंबई, पुणे, हैद्राबाद आणि डेहराडून (उत्तराखंड) येथे २८-३० खेळांसाठी १२ चॅम्पियनशिप्सचे आयोजन केले. त्यामध्ये ४००० हून अधिक शाळांमधून २००,००० क्रीडापटूंचा सहभाग होता. याशिवाय, ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,
गुजरात, २०२२ आणि खेलो इंडिया युथ गेम्स, हरियाणा, २०२१ हे एसएफएच्या टेक आईपी गेम्स मैनेजमेंट सिस्टमद्वारे समर्थित होत्या. २०२३ मध्ये, एसएफएने खेलो इंडिया युथ गेम्ससाठी प्रायोजक म्हणून काम स्वीकारले आहे. टेक आणि डेटा अॅनालिटिक्समधील क्षमतांद्वारे शालेय स्तरावरील क्रीडा क्षमता शोधण्यासाठी आणि भविष्यातील चॅम्पियन घडवण्यासाठी एसएफए चॅम्पियनशिपला प्रमुख यंत्रणा बनवण्याचा दृष्टीकोन आहे.
0 Comments