‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’वर ७० टक्के घशघशीत व्यवसायवाढ

‘प्राइम डे २०२३’ उपक्रमादरम्यान भारतीय निर्यातदारांनी घेतला अनुभव



बंगळुरू  : या वर्षी ११ आणि १२ जुलै रोजी जागतिक स्तरावर आयोजित झालेल्या ‘प्राइम डे’ या उपक्रमादरम्यान, ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’मध्ये भारतीय निर्यातदारांनी मागील वर्षांच्या सरासरीपेक्षा जवळपास ७० टक्के जास्त व्यवसाय मिळवला आहे. या दोन दिवसीय विक्री मोहिमेत भारतीय निर्यातदारांनी जगभरातील ग्राहकांना लाखो ‘मेड इन इंडिया’ उत्पादने विकली.

सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीत १२५ टक्के, कपड्यांच्या विक्रीत १२२ टक्के, घरगुती वस्तूंच्या विक्रीत ८१ टक्के, फर्निचरमध्ये ७५ टक्के, गृहोपयोगी वस्तूंमध्ये ५२ टक्के अशी ही वाढ झाली आहे. ‘अॅमेझॉन’वर जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना मिळालेल्या या यशामुळे देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (एमएसएमई) आणि स्टार्ट-अप्समध्ये ईकॉमर्स निर्यातीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

होमस्पन ग्लोबल, कॅलिफोर्निया डिझाईन डेन, ग्लॅमबर्ग, इंडो काउंट, स्किलमॅटिक्स, हिमालया यांसारख्या जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या अनेक भारतीय ब्रँड्सनी ‘प्राइम डे २०२३’मध्ये भाग घेतला.

जागतिक स्तरावरील प्राइम डेदरम्यान टियर-टू आणि टियर-थ्री शहरांमधील भारतीय निर्यातदारांच्या व्यवसायात झालेली वाढ

पानिपत  ७६ टक्के (वार्षिक दरानुसार)

इंदूर  ५९ टक्के (वार्षिक दरानुसार)

जयपूर  ५६ टक्के (वार्षिक दरानुसार)

इरोड  ४२ टक्के (वार्षिक दरानुसार)


“जागतिक स्तरावर ‘अॅमेझॉन प्राइम’चे २० कोटींहून अधिक सदस्य आहेत. त्यांचा विचार करता, प्राइम डे हा भारतीय निर्यातदारांसाठी ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’साठी नेहमीच व्यवसाय वाढीचा व महत्त्वाचा काळ असतो. या वर्षी देशभरातील हजारो निर्यातदारांनी जगभरातील ग्राहकांना लाखो ‘मेड इन इंडिया’ उत्पादने पुरविली, हे आमच्या निदर्शनास आले.

जागतिक स्तरावर अधिकाधिक लोक ई-कॉमर्सवर अवलंबून राहू लागले आहेत. म्हणूनच आमचा विश्वास आहे की ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ हा उपक्रम सर्व श्रेणीतील विक्रेत्यांच्या निर्यात व्यवसायाला गती देईल,” असे ‘अॅमेझॉन इंडिया’चे ग्लोबल ट्रेड विभागाचे संचालक भूपेन वाकणकर म्हणाले.

“जागतिक स्तरावर ‘अॅमेझॉन प्राइम’चे २० कोटींहून अधिक सदस्य आहेत. त्यांचा विचार करता, प्राइम डे हा भारतीय निर्यातदारांसाठी ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’साठी नेहमीच व्यवसाय वाढीचा व महत्त्वाचा काळ असतो. या वर्षी देशभरातील हजारो निर्यातदारांनी जगभरातील ग्राहकांना लाखो ‘मेड इन इंडिया’ उत्पादने पुरविली, हे आमच्या निदर्शनास आले.

जागतिक स्तरावर अधिकाधिक लोक ई-कॉमर्सवर अवलंबून राहू लागले आहेत. म्हणूनच आमचा विश्वास आहे की ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ हा उपक्रम सर्व श्रेणीतील विक्रेत्यांच्या निर्यात व्यवसायाला गती देईल,” असे ‘अॅमेझॉन इंडिया’चे ग्लोबल ट्रेड विभागाचे संचालक भूपेन वाकणकर म्हणाले.

प्राइम डे दरम्यान भारतीय निर्यातदारांद्वारे जागतिक स्तरावर विकली जाणारी शीर्ष पाच  उत्पादने

1.       बेडशीट्स

2.       स्क्रब अपरल सेट

3.       विंडशील्ड सनशेड्स

4.       स्टेम टॉईज

5.       किचन उत्पादने (स्लाईसर्स)


“प्राइम डे २०२३’ हा आमचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम ठरला. आमच्या व्यवसायात गेल्या वर्षीपेक्षा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली, तसेच आमच्या व्यवसायाच्या सरासरी प्रमाणाच्या तुलनेत ६ पट अधिक वाढ आम्ही साध्य केली. उत्पादनांच्या सादरीकरणासाठी प्रगत नियोजन, सौद्यांमध्ये सक्रिय सहभाग, विपणनाचे जोमदार प्रयत्न आणि इन्व्हेन्टरीचे सावधपणे केलेले व्यवस्थापन यांतून आम्हाला हे यश मिळाले,” असे ‘लिननवालाज’चे संस्थापक मधुर सिंघल यांनी सांगितले.

‘आईन्स्टाईन बॉक्स’चे संस्थापक भरत गुलिया म्हणाले, “आम्ही गेल्या वर्षीच्या ‘प्राइम डे’च्या तुलनेत यंदा ५ पटींनी जास्त वाढ अनुभवली. ‘अॅमेझॉन डॉट कॉम’वर ‘अर्ली लर्निंग’ आणि ‘सायन्स किट्स’ची आम्ही २०२१ पासून यशस्वीपणे विक्री करीत आहोत. या उत्पादनांना ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद आहे. जागतिक बाजारपेठेत या उत्पादनांना खरोखरच प्रचंड मागणी आहे. ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’मुळे आम्ही आमच्या व्यवसायात लक्षणीय वाढ करू शकलो. जागतिक बाजारपेठांमध्ये आम्हाला मिळालेल्या या यशामुळे भारतीय उत्पादक असल्याचा आम्हाला मोठा अभिमान तर वाटतोच, त्याशिवाय रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यास आम्ही सक्षम झालो आहोत.”

भारतीय उत्पादनांना मोठी मागणी

उत्तर अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, जपान आणि यांसारख्या इतर बाजारपेठांमधील ‘अॅमेझॉन’च्या ग्राहकांनी विविध श्रेणींमध्ये भारतीय निर्यातदारांकडून उत्पादनांची खरेदी केली. सौंदर्य प्रसाधने, कपडे, घरगुती वस्तू, गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, खेळणी यांसारख्या श्रेणींमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. यूएस, यूके आणि मध्य पूर्व या प्रदेशांमध्ये यंदाच्या ‘प्राइम डे’मध्ये भारतीय निर्यातदारांचा व्यवसाय वाढला; जपान हा देश उच्च वाढीचे गंतव्यस्थान म्हणून नव्याने उदयास आले. येथे विक्रेत्यांनी ५५ टक्के वाढ अनुभवली.

“आम्ही २०२१ मध्ये ‘अॅमेझॉन यूएई’वर ‘मिनिमलिस्ट’ सादर केले आणि अल्पावधीतच आम्ही बरेच काही साध्य केले आहे. ‘अॅमेझॉन’वर आमचा यूएईमधील व्यवसाय १०७ टक्के वार्षिक दराने प्रभावीपणे वाढत आहे. ‘प्राइम डे २०२३’ या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आमचा व्यवसाय दुप्पट आणि दुसऱ्या दिवशी चौपट वाढला. १० टक्के फेस सीरम आणि व्हिटॅमिन बी५ मॉईश्चरायझर असलेली ‘नियासिनामाईड’सारखी आमची नाविन्यपूर्ण उत्पादने ग्राहकांमध्ये सर्वोत्कृष्ट ब्रँड म्हणून लोकप्रिय झाली आहेत, तसेच जगभरातील ग्राहकांमध्ये ती विश्वसनीय ठरली आहेत,” असे प्रतिपादन ‘मिनिमलिस्ट’चे संस्थापक मोहित यादव यांनी केले.

भारतीय उत्पादनांसाठी जागतिक आकर्षण निर्माण करणे

प्राइम डे २०२३च्या अगोदर, ‘अॅमेझॉन’ने ‘ग्लोबल सेलिंग’वर प्रमुख शॉपिंग ट्रेंड ओळखण्यासाठी आणि संबंधित उत्पादनांचे वर्गीकरण आणण्यासाठी भारतीय निर्यातदारांसोबत बरेच काम केले. त्यांची इन्व्हेंटरी तयार होण्यासाठी क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिस, पेमेंट इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांना मदत केली, तसेच अनेक सौदे आणि जाहिरात पर्याय यांबाबत शिफारसही केली.

जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी भारतीय विक्रेत्यांना पाठिंबा देण्याच्या ‘अॅमेझॉन’च्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करताना, भूपेन वाकणकर पुढे म्हणाले, “२०२५पर्यंत भारतातून २० अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात साध्य करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. लहान व्यवसायांसाठी निर्यात ही सुलभ आणि सोपी असावी, यावर ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ची संपूर्ण टीम लक्ष केंद्रित करते आणि भारत सरकारच्या निर्यात वाढवण्याच्या धोरणात मोलाचे योगदान देते.”

Post a Comment

0 Comments