शिवसेनेच्या वतीने पुण्यात संजय राऊतांविरोधात जोरदार आंदोलन

संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार : शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे


पुणे : शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांच्या निषेध करण्यासाठी पुण्यातील गुडलक चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला चपला मारून तसेच जोरदार घोषणाबाजी करून राऊत यांचा निषेध केला. या आंदोलनात शिवसेनेसह युवा सेवा व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

या वेळी बोलताना शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले असून, आम्ही त्यांचा तीव्र निषेध करीत आहोत. संजय राऊत यांना लवकरच वेड्यांच्या इस्पितळात पाठवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी किरण साळी म्हणाले की, ज्याप्रमाणे ते माईकवर थुंकलेत येणाऱ्या निवडणुकीत मतदार मतपेटीतून संजय राऊतच्या तोंडावर थुंकतील. सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले म्हणाले की, कोणतेही काम नसलेल्या संजय राऊत यांच डोकं ठिकाणावर नसून माध्यमांनी त्यांना महत्त्व देऊ नये प्रत्येक वेळेस बेताल वक्तव्य करून ते महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरतात, आता हे सहन केल्या जाणार नाही.

यावेळी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यासह संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवासेना राज्यसचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे,

शहर संघटक श्रीकांत पुजारी, महिला आघाडी अध्यक्षा लीनाताई पानसरे, महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, युवासेनेचे आकाश शिंदे, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, संजय डोंगरे, विकास भांबुरे, राजाभाऊ भिलारे, सचिन थोरात, नितीन लगस, गौरव साइनकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख राजाभाऊ भिलारे, महिला संघटिका श्रद्धा शिंदे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments