MIT-ADT विद्यापीठात झालेल्या समर कॅम्पला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दिले स्वीमिंग, योगा आणि झुंबाचे प्रशिक्षण


पुणे : विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्वांगीण पद्धतीने घडवणारी संस्था एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या परिसरात नुकताच महिनाभराचा समर कॅम्प पार पडला. सर्वांसाठी खुला असलेल्या या समर कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ५ वर्षांच्या बालकांपासून ते साठ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सुमारे ४०० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

दि. २ मे रोजी या समर कॅम्पला सुरवात करण्यात आली होती आणि ५ जून रोजी या कॅम्पचा समारोप झाला. या दरम्यान सर्व विद्यार्थी व मोठ्या नागरिकांना स्वीमिंग, योगा आणि झुंबाचे प्रशिक्षण देण्यात आले.  

समर कॅम्पच्या शेवटी कॅम्पमध्ये सामिल सर्वांसाठीच क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विविध वयोगटांमध्ये झालेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वच स्पर्धकांनी भाग घेऊन आपल्या क्रीडा व कलागुणांची प्रस्तुती दिली. या क्रीडास्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 

कॅम्पमध्ये सहभागी स्पर्धकांना एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डाॅ. मंगेश कराड यांच्या नेतृत्वात तथा क्रीडा संचालक तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते पद्माकर फड, स्टुडंट अफेयर्सचे असोसिएट डायरेक्टर प्रा. डाॅ. सुराज भोयर, एनसीसी विंगच्या प्रमुख मेजर सुमन कुमार डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीयस्तरावरील प्रशिक्षक प्रकाश सी., सिद्धार्थ गर्ग, तानाजी शिंदे, बाबुराव पवार, रूपाली परदेशी, निशा बोंडे, निधि विश्वकर्मा, जुली इंदवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच समर कॅम्पमध्ये सपोर्टिंग स्टाफच्या रुपात महेश सावंत, बाबासाहेब होळंबे, किशोर काठारे, अंगद कांबळे, प्रसाद कुंभार, प्रशांत मोरे, केशव् घुले, प्रियदर्शनी जागुष्टे यांनी कामकाज पाहिले. 


सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न - डाॅ. मंगेश कराड

या उपक्रमासंदर्भात बोलताना एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, आमच्या विद्यापीठाअंतर्गत चालणाऱ्या सर्वच शाळा-महाविद्यालयांमध्ये सर्वोत्तम शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामुळेच या विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालये व शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी क्रीडा, नृत्य, अभिनय व विभिन्न कलेच्या क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर सुयश प्राप्त करीत आहेत. सध्या एमआयटी-एडीटीच्या कॅम्पसमध्ये स्वीमिंगसाठी एक आॅलिम्पिक दर्जाचा तरणतलाव असून, इतर सर्वच क्रीडा प्रकारांसाठी येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.


समर कॅम्प एक प्रशंसनीय उपक्रम - पालक विशाल हाके

या समर कॅम्पमध्ये सामिल झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांनीही कॅम्पसंदर्भात खूपच समाधान व्यक्त केले. पालक विशाल हाके या संदर्भात म्हणाले की, एमआयटी-एडीटीच्या वतीने आयोजित समर कॅम्प एक प्रशंसनीय उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह विविध अंगभूत कलागुणांचा विकास करण्यास वाव मिळतो. येथे अतिशय उत्तम दर्जाच्या सुविधा आणि कोचेस उपलब्ध आहेत, ज्यामुळे आयुष्यात विविध क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा बेस पक्का होतो.


प्रोफेशनल ट्रेनिंगसाठी १ जुलैपासून बॅच सुरू होणार

एमआयटी-एडीटी स्थित डाॅ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये सध्या प्रोफेशनल खेळाडू घडवण्याचे काम होत आहे. या अॅकॅडमीमध्ये स्वीमिंग आणि बाॅक्सिंग यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठीची बॅच दि. १ जुलैपासून सुरू होत आहे. या खेळांमध्ये भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमआयटी-एडीटीच्या डाॅ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments