कोथरुड वैद्यकीय मंचाचा अनोखा उपक्रम; सहयोग फाऊंडेशनला औषधे सुपूर्द
पुणे : शहरातील कोथरूड वैद्यकीय मंचाच्या वतीने आषाढी वारीच्या माध्यमातून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी औषधांचे संकलन करण्यात आले. गेल्या १२ वर्षांपासून कोथरुड वैद्यकीय मंच हा उपक्रम आयोजित करीत असते.
संकलित करण्यात आलेली ही औषधे सहयोग फाऊंडेशनच्या वतीने आषाढी वारी दरम्यान वारकर्यांना मोफत वितरीत करण्यात येत असतात. या वर्षीही कोथरूड वैद्यकीय मंचाने आपल्या विविध सहकारी डॉक्टरांच्या सहयोगाने शुक्रवार ९ जून रोजी औषधांचे संकलन केले. साई क्लिनिक, कर्वे नगर येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ही औषधे सहयोग फाउंडेशनला सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कोथरूड वैद्यकीय मंचचे अध्यक्ष डॉ. संजय बुटाला, स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे डॉ. संदीप बुटाला, जीपीएचे माजी अध्यक्ष डॉ. महेश वायाळ, नगरसेविका अश्विनी जाधव, कोकण महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव, सहयोग फाऊंडेशनचे उल्हास तापकीर, डॉ. धनश्री वायाळ, डॉ. शुभदा जोशी, डॉ. दीपाली भुजबळ, डॉ. सुनील भुजबळ, डॉ. संतोष गोसावी, डॉ. पवळे, डॉ. योगेश भागवत आदी उपस्थित होते.
0 Comments