पुणे : आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक वार्षिक विक्रीची रेकॉर्डब्रेक कामगिरी नोंदवल्यानंतर, सोनालिका ट्रॅक्टर्सने आर्थिक वर्ष २०२४ मध्येही हीच गती पुढे चालू ठेवण्याची विश्वास व्यक्त केला आहे.
भारताचा क्रमांक १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालीकाने एप्रिलमधील सर्वाधिक १२,५९० ट्रॅक्टर विक्रीचा नवा विक्रम गाठला आहे. त्यामुळे शेतकरी समुदायामध्ये या ब्रँडला असलेली पसंती वेगाने वाढत असल्याचे अधोरेखित होते. या असाधारण कामगिरीमुळे ट्रॅक्टर उद्योगात कंपनीचा मार्केट शेअर १.९ टक्के ने वाढला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या सोनालिकाचा सर्वांगीण दृष्टीकोन कंपनीच्या वाढीला सतत चालना देत आहे.
संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रक्रियांवर तसेच शेतकऱ्यांशी नाळ जोडण्यावर कंपनीचे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शक्तिशाली इंजिन, इंटेलिजेंट ट्रान्समिशन आणि हायड्रॉलिकसह ट्रॅक्टरच्या विस्तृत श्रेणीची रचना करणे कंपनीला शक्य झाले आहे.
त्यामुळे उत्पादकता आणि नफ्याची नवीन शिखरे गाठणे शेतकऱ्यांना शक्य होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये शेतकऱ्यांना खुशी मिळेल अशी उत्कृष्ट उत्पादने आणि सेवा देण्यासाठी सोनालिका पूर्णपणे सज्ज आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले की “आमचा मजबूत पाया, दमदार प्रक्रिया आणि उत्पादन पोर्टफोलिओच्या बळावर नवीन आर्थिक वर्षात धमाकेदार प्रवेश करताना खूप आनंद होत आहे.
शेतकऱ्यांसाठी सहज उपलब्धतेसह परवडणारी नाविन्यपूर्ण उत्पादने सुनिश्चित करण्यात सातत्य राखणे याला आमच्या दृष्टीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सर्वोच्च प्राथमिकता राहील.”
0 Comments