शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी महोगनी वनशेती संकल्पना जाहीर

मिटकॉन आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. यांचा  संयुक्त उपक्रम

कार्बन मुक्त पर्यावरणाच्या दिशेने मिटकॉनचे एक पाऊल !


पुणे : शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी   मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग  सर्विसेस (पुणे ) आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. यांनी  संयुक्त उपक्रद्वारे  महोगनी वनशेती संकल्पना आणली असून शेतकऱ्यांना  महोगनी वनशेतीसाठी प्रोत्साहित करून सल्ला, सेवा आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजीनियरिंग  सर्विसेस (पुणे ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी  हर्षद जोशी, कार्बन क्रेडीट हेड धवल मरघडे, नेचर बेस्ड सोल्युशन लि. चे व्यवस्थापकीय संचालक भगतसिंग शेळके   यांनी शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीरिंग सर्व्हिसेस लि. पुणे आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रा. लि. यांच्या संयुक्त उपक्रमांर्तगत मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशनस लि. कंपनी ची स्थापना करण्यात आली आहे. मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशनस लि. चे कृषी-आधारित उपक्रमांद्वारे हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी करण्याबरोबरच CO2 (कार्बन डायऑक्सिड) उत्सर्जन कमी करण्यास सहाय्य करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी बनण्याचे आणि निर्माण केलेल्या उच्च दर्जाच्या निसर्ग-आधारित कार्बन क्रेडिट्समधून शाश्वत शेती उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.

हा प्रकल्प संपूर्ण जैव-विविधता सुधारण्यात आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योगदान देईल ज्यामुळे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. जागतिक कार्बन मुक्त पर्यावरणाच्या दिशेने मिटकॉनचे हे एक पाऊल आहे. मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड च्या प्रथम उपक्रमांतर्गत, महोगनी वनशेतीद्वारे व्यावसायिक तत्वावर करार पद्धतीने वृक्ष लागवड करून  व्यावसायिक वनशेती संकल्पना राबवत आहे. ह्या उपक्रमांकार्गत ५००० शेतकऱ्यांच्या सहभागातून सुमारे ६००० एकर महोगनी वनशेतीची लागवड करण्यात आली आहे.    

मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड च्या ध्येयानुसार, कृषी क्षेत्रात व कृषी संदर्भातील विविध व्यवसायातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. जसे की वनशेती – उदा. बांबू, चंदन, महोगनी, सिल्वर ओक, इ.,फलोत्पादन – उदा. औषधी वनस्पती, फळबागा, सुगंधी तेल, इ.,बायोचारचा वापर, सेंद्रिय शेती, सुधारित पाणी आणि खत व्यवस्थापन, भात आणि ऊस लागवडीसह सुधारित कृषी पद्धती, अपारंपरिक ऊर्जा, जैवइंधन, बायोगॅस (गोबरगॅस) आणि इतर कृषिअवशेष आधारित उपक्रम यांचा समावेश आहे.

स्वयंपूर्ण ग्रामविकास घडवून आणण्याकरिता लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IWST), व कृषी आणि भारतीय वानिकी अनुसंधान विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्यावसायिक पद्धतीने कृषी-वानिकी संकल्पना राबविण्यात येत आहे.

भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांची आर्थिक व सामाजिक व्यवस्था सूसूत्र होणे तसेच खेड्यांचे चैतन्य पुर्नजागृत करणे यासाठी शाश्वत वनशेती व त्याच्या व्यवस्थापनातून निसर्गस्नेही रचना हे या व्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे.

शेती आणि शेतकरी पुर्नस्थापित करणे हे उद्दिष्ट घेऊन मिटकॉन कार्यरत आहे.शेती हा आपल्या भारतीय अर्थ आणि सामाजिक व्यवस्थेचा कणा आहे. शेती आणि शेतकरी परस्पर संबंध दृढ करणे व पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्याचा गाभा आहे तसेच वृक्षसंपदा, वने आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे व ते अबाधितपणे पुढील पिढीला हस्तांतरित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  

मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड चे  आगामी प्रकल्प:

मिश्र प्रजाती वृक्षारोपण, जैव-इंधन, बायोचार हे आगामी प्रकल्प आहेत. मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद चलवदे यांच्याशी बोलताना, ते म्हणाले, “मिटकॉन आपल्या स्थापनेपासूनच हवामान बदल/ शाश्वत विकास ध्येय क्षेत्रात व नूतनीकरणक्षम ऊर्जा, कार्बनचे प्रमाण कमी करणे , जैवइंधन, ऊर्जा कार्यक्षमता इत्यादी क्षेत्रात अग्रेसर आहे.

श्री. भगतसिंग शेळके आणि महोगनी विश्व ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोबतचा हा संयुक्त उपक्रम, शेतकरी समुदायाच्या सहभागाद्वारे मिटकॉनच्या शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करेल. आमच्या विविध प्रकल्पांतर्गत संपूर्ण भारतात ५० कोटींहून अधिक झाडे लावली जातील आणि शेतीचे उत्पन्न सुधारण्यात आणि स्थिर होण्यास हातभार लागेल.”

आपले विचार मांडताना मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. भगतसिंग शेळके यांनी, "ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या शेतकरी व शेतीच्या शाश्वत विकास, स्वस्थ पर्यावरणासाठी, लोक सहभागातून मिटकॉन नेचर बेस्ड सोल्युशन लिमिटेड कार्यरत राहील.“ असे मनोगत व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments