सारंग सराफ, वसुधा वडके, समृद्धी पटेकर यांना यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार

कसबा संस्कार केंद्राचा ३८ वा वर्धापनदिन ; योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांची उपस्थिती


पुणे : श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग सराफ, अष्टपैलू कलाकार वसुधा वडके आणि गायिका समृद्धी पटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

रविवार, दिनांक २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालय सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनघा दिवाणजी, संगीता ठकार, संदीप लचके, सारिका पाटणकर, अपेक्षा राऊत, प्रिती नाईकवडी, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत, रुपेश कुलकर्णी, चैताली सरमहाले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार नृत्यांगना हर्षदा बांदल आणि खेळाडू प्रांजल पोटफोडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर, बालगौरव पुरस्कार कलाकार ईशान जबडे याला प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद आणि श्री देशमुख महाराज फाऊंडेशनचे प्रमुख प.पू. गुरुदास देशमुख महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. कार्यक्रमाला अॅड. प्रताप परदेशी, हेमंत रासने, धीरज घाटे, योगेश समेळ, सीमा सरदेशपांडे, कल्पना जाधव, प्रल्हाद गवळी देखील उपस्थित राहणार आहेत.

अनिल दिवाणजी म्हणाले, नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्कार वर्गातील ७५ मुला-मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील स्वाधार संस्थेमार्फत पालनपोषण करण्यात येणा-या देवदासींच्या मुला-मुलींना येणारा शैक्षणिक वर्षासाठी मदत म्हणून विविध प्रकारचे साहित्य भेट देण्यात येणार आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सुसंस्कारसंपन्न भावी पिढी निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बालसंस्कार केंद्र चालविण्यात येते.

Post a Comment

0 Comments