पुणे : इयत्ता बारावीच्या केंद्रीय बोर्डाचा निकाल शुक्रवार १२ मे रोजी घोषित करण्यात आला. सीबीएसईने विविध संकेतस्थळांवरून व मोबाईल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या निकालाची माहिती प्राप्त होण्यास मदत होत आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी आघाडी घेतली आहे. परीक्षेला बसलेल्या मुलींचा निकाल ९०.८६, तर मुलांचा ८४.६७ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल विद्यार्थी संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाहण्यास उपलब्ध झालेला आहे.
दि. १५ फेब्रुवारी ते दि. ५ एप्रिल या कालावधीत बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. या परीक्षांना देशभरातून १६ हजार ७२८ शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थी प्रत्यक्षपणे परीक्षेला बसले होते.
या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावीचा एकूण निकाल ८६. ३३ टक्के लागला आहे. यंदाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.३८ टक्क्यांनी घटला आहे.
सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे...
0 Comments