ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये ड्रोन लॅबचे उद्घाटन
पुणे : "प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांनी अध्यापनाला संशोधन व नावीन्यतेची जोड द्यावी. एकविसाव्या शतकातील आधुनिक पद्धती, नवोपक्रम आत्मसात करावेत," असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिला.
ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने इनोव्हेशन क्लब अंतर्गत उभारलेल्या ड्रोन लॅब व डिजिटल स्मार्टबोर्डच्या उद्घाटनावेळी डॉ. चासकर बोलत होते. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू शिल्पा चिल्लाळ, केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक मेजर जनरल (नि.) समीर कल्ला, प्राचार्य डॉ. अभिजीत औटी आदी उपस्थित होते.
कल्याण जाधव म्हणाले, "ड्रोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील विकासासाठी काम करावे. प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात अशा नवनवीन उपकरणाचा वापर करत तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून शिक्षण क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी वाटचाल करण्याला प्राधान्य द्यावे."
ड्रोनास्त एनर्जी फ्लाईट ठाणे यांच्या सहकार्याने उभारलेल्या या लॅबमध्ये राकेश कुमार व रोहन मुरली यांनी विद्यार्थ्यांना बेसिक ड्रोन असेम्बली, ड्रोन वापरातील अॅप, शेतातील फवारणी, सर्वे कोर्स, इंडस्ट्रीमधील ड्रोनचा वापर, ड्रोनचे पार्ट, मेंन्टनस, ड्रोन प्रकार आदी समजावून सांगितले. शिक्षण क्षेत्रात ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. प्रा. गजानन आरसलवाड यांनी डिजिटल स्मार्ट बोर्डचे प्रात्यक्षिक दाखवले.
हर्षदा जाधव, समीर कल्ला यांनी मार्गदर्शन केले. ड्रोन लॅबचे उद्दिष्ट व भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी होणाऱ्या याच्या उपयोगाबाबत डॉ. औटी यांनी माहिती दिली. महाविद्यालयात नवतंत्रज्ञानाचे असे उपक्रम प्राधान्याने राबविण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रोन लॅबमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
विभागप्रमुख प्रा. प्रतिक आकरे, प्रा. महेंद्र हंडोरे, प्रा. वैभव शेलार, प्रा. गजानन आरसलवाड, प्रा.अमोल भोसले, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. शरद भोसले, प्रितम अनुसे, सिद्धार्थ खंडागळे, महेश संकपाळ, निलेश वाबळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments