निवासी आणि सर्व व्यावसायिक-औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दर स्पर्धात्मक

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांचा दावा


पुणे : मुंबईतील प्राथमिक वीज सेवा प्रदाता कंपनी अदाणी इलेक्ट्रिसिटी ३१ लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांच्या ग्राहकांना योग्य दरात शाश्वत वीज पुरवठा देत आहोत, असा दावा अदाणी इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी केला आहे.

पटेल यांच्याकडून जारी प्रसिद्धिपत्रकात पुढे म्हटले आहे की, आयात कोळसा आणि वायुच्या किमती याबाबतच्या अस्थिरतेमुळे निमित्त ठरलेल्या देशभरातील दरवाढीमुळे निर्माण झालेली आव्हाने कायम असूनही कंपनीकडून होत असलेली दरवाढ ही संपूर्ण महाराष्ट्रात तुलनेत सर्वात कमी आहे. 

नियामकाने जारी केलेल्या वीज दरांचे आम्ही स्वागत करतो. आमच्या ग्राहकांसाठी दीर्घकाळापासून असलेली वचनबद्धता साध्य करण्यासाठी आमच्या अथक प्रयत्नांना हे वीज दर प्रोत्साहन देतात; आमच्या ग्राहकांना सर्वात विश्वासार्ह, परवडणा-या दरात तसेच शाश्वत वीज पुरवठ्यासह सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे दर हे उपनगरीय मुंबईतील बहुतांश दर श्रेणीमध्ये सर्वाधिक स्पर्धात्मक असे आहेत. याद्वारे ग्राहकांची लक्षणीय बचत होते, अशी माहिती पटेल यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे. 


Post a Comment

0 Comments