पेशंट अकॅडमी फॉर इनोव्हेशन अँड रिसर्चचे प्रयत्न
पुणे : एण्डोमेट्रिओसिस जागरूकता मासाचे औचित्य साधून पेशंट अकॅडमी फॉर इनोव्हेशन अँड रिसर्चने बायरच्या पाठबळासह पहिल्यावहिल्या `एन्डोरन`चा दुसरा टप्पा नुकतात पुण्यात पूर्ण केला.
`एन्डोरन` हा जनजागृती उपक्रम आहे. हा उपक्रम विकारातून बरे झालेले रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, आरोग्यसेवा पुरवठादार, संशोधक तसेच समर्थकांना, एण्डोमेट्रिओसिसशी संबंधित सामाईक उद्दिष्टासाठी एकत्र आणतो. एण्डोमेट्रिओसिसबाबत जागरूकता निर्माण करणे, ह्या अवस्थेबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणणे तसेच ह्या विकाराने ग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा व संसाधने मिळावीत ह्यासाठी आवाहन करणे हे ह्या उपक्रमाचे ध्येय आहे. जागरूकता उपक्रमामध्ये रुग्णांच्या विविध समूहांतील १००हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
एण्डोमेट्रिओसिस ही एक मोठ्या प्रमाणात आढळणारी, दीर्घकाळ बरी न होणारी स्त्रीरोगविषयक अवस्था आहे. जगभरात २४ कोटी ७० लाख स्त्रिया एण्डोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत. ह्यातील ४ कोटी २० लाख स्त्रिया भारतात आहेत
ह्या विकारात गर्भाशयाच्या अस्तरातील पेशीसमूहासारखाच पेशीसमूह गर्भाशयाबाहेर वाढतो२. एण्डोमेट्रिओसिसने ग्रस्त स्त्रियांना सतत ओटीपोटात वेदना होत राहतात, थकवा जाणवतो, नैराश्य येते तसेच वंध्यत्वाची समस्याही येते. ह्या अवस्थेचे निदान होण्यास ६-१० वर्षांचा विलंब झाल्यास स्त्रीच्या एकंदर आयुष्याचा दर्जा लक्षणीयरित्या खालावतो.
एण्डोरनची सुरुवात फिनिक्स सिटी मॉलच्या नॉर्थ गेटपासून झाली. अदार पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिवचे स्वयंसेवक सत्या नटराजन आणि सुरेंद्र पाठारे फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुरेंद्र भाऊसाहेब पाठारे यावेळी उपस्थित होते. अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स आणि रुग्ण सहाय्य समूहाच्या सदस्यांनी एण्डोमेट्रिओसिसबाबत तज्ज्ञ सल्ल्याच्या माध्यमातून ह्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
पेशंट अकॅडमी फॉर इनोव्हेशन अँड रिसर्चच्या संचालक डॉ. रत्ना देवी म्हणाल्या, “तीव्र लक्षणे व त्रासदायक वेदना सहन करणाऱ्या स्त्रियांमधील विकाराचे निदान व त्यावरील उपचार ह्यांना होणाऱ्या विलंबाच्या समस्येवर मात करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे निर्णायकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने अनेक कुटुंबांमध्ये स्त्रियांच्या वेदनांकडे लक्ष दिले जात नाही आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्यही दिले जात नाही.
लवकर निदान व उपचार पर्यायांमध्ये सुधारणेचा आग्रह धरला जाणे अत्यावश्यक आहे. स्त्रिया त्यांचे अनुभव मोकळेपणाने सांगू शकतील आणि त्यांना सहाय्य पुरवले जाईल असे सुरक्षित व सहाय्यकारी वातावरण तयार करणे ही तातडीची गरज आहे.”
"एण्डोमेट्रिओसिस ह्या अवस्थेने जगभरात कोट्यवधी स्त्रियांना ग्रासलेले आहे. स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भातील आमच्या सखोल कौशल्याच्या माध्यमातून, एण्डोमेट्रिओसिसबाबत जागरूकता वाढण्यासाठी, आम्ही बांधील आहोत. पीएआयआरशी सहयोग केल्याचा तसेच आरोग्यसेवेचे अधिक चांगले उपाय स्त्रियांसाठी उपलब्ध करण्यात योगदान देणाऱ्या उपक्रमाला पाठिंबा दिल्याचा आम्हाला आनंद वाटतो. एण्डोमेट्रिओसिसचे निदान वेगवान होण्यासाठी रुग्ण व रुग्ण समूहांमध्ये माहितीचे आदानप्रदान तसेच संवाद निर्माण करणे आवश्यक आहे," असे बायर झायडस फार्माच्या स्त्री आरोग्यविषयक व्यवसाय विभागाचे प्रमुख दीपक चोप्रा यांनी सांगितले.
0 Comments