सिम्बायोसिस इंटरनॅशनल ने युजी प्रोग्राम्स प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

एसइटी, एसएलएटी आणि एसआयटीइइइसाठी पैसे भरण्याचा शेवटचा दिवस १२ एप्रिल 


पुणे :
  सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) (एसआययू ) ने ६ मे, २०२३ आणि १४ मे, २०२३ रोजी होणार्‍या सिम्बायोसिस एंट्रन्स टेस्ट (एसइटी) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याची घोषणा केली. अनेक वेळा परीक्षा देण्याची मुभा असल्यामुळे, इच्छुक उमेदवार एसआययू अंतर्गत 

व्यवस्थापन, कायदा, अभियांत्रिकी, जनसंवाद, अर्थशास्त्र, लिबरल आर्ट्स, आयटी आणि संगणक अनुप्रयोग, उपयोजित सांख्यिकी आणि डेटा सायन्समध्ये पदवीपूर्व कार्यक्रमऑफर करणाऱ्या १६ संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

डॉ. रजनी गुप्ते,  कुलगुरू, सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) म्हणाल्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे आपल्या देशाच्या शैक्षणिक परिदृश्यात बदल घडवून आणणारे आहे. हे एक दूरदर्शी धोरण आहे जे आपल्याला विकास, लवचिकता आणि नवीन युगातील शिक्षणात नवीन शिखरे गाठायला मदत करेल.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये, एनईपी २०२० द्वारे निर्धारित केलेल्या उद्दिष्टांशी जुळवून घेण्यासाठी, आम्ही आधीच विविध उपक्रम राबवत आहोत. आमचे विविध कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांना कौशल्य आणि ज्ञानाने सुसज्ज असल्याची खात्री करून त्यांना सर्वांगीण आणि बहुविद्याशाखीय शिक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत जी वेगाने विकसित होणाऱ्या उद्योग आणि नोकरी क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.

सेट (एसइटी), एसएलएटी (सेट-लॉ ), आणि एसआयटीइइइ (सेट – इंजिनीरिंग) मध्ये विभागलेले असल्यामुळे, विद्यार्थी - https://www.set-test.org वर जाऊन एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकतात.

एसइटी, एसएलएटी आणि एसआयटीइइइ नोंदणी शुल्क १,९५० रुपये आहे. आणि कोर्स नोंदणी शुल्क १,००० रुपये प्रति कार्यक्रम आहे. चाचणी / चाचण्यांचे नोंदणी शुल्क तसेच / कार्यक्रमांचे नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही (non-refundable) आणि ते अहस्तांतरणीय (non-transferable) असतील.

उमेदवार संबंधित शुल्क ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरू शकतात. पुढे, एसइटी, एसएलएटीसाठी कालावधी १ तास आहे. आणि एसआयटीइइइ साठी चाचणीचा कालावधी २ तास आहे. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही. 

एसइटी, एसएलएटी आणि एसआयटीइइइ चाचणी १ (६ मे २०२३ रोजी आयोजित केली जाणार) साठी प्रवेशपत्रे २२ एप्रिल २०२३ रोजी आणि एसइटी चाचणी २ (१४ मे, २०२३ रोजी आयोजित केली जाणार) साठी प्रवेशपत्रे २८ एप्रिल २०२३ रोजी जारी केली जातील. उमेदवार अधिकृत वेबसाइट (set-test.org) वरून त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

संपूर्ण भारतातील ७६ शहरांमध्ये संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने एकाच वेळी प्रवेश परीक्षा घेतल्या जातील. एसएलएटी (सकाळी ९ ते सकाळी १० पर्यंत), सेट एसइटी (सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० पर्यंत), आणि एसआयटीइइइ (दुपारी २ पासून ते ३ पर्यंत). चाचण्यांच्या या वेळा आहेत 

Post a Comment

0 Comments