एसएफआयने पाठवले राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे पत्र
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी चाळीस कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकरण उघडकीस आला आहे. ही रक्कम कष्टकरी, कामगार वर्गातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकडून कोरोनाकाळात परीक्षा फी च्या नावाने वसूल केलेली आहे. त्यामुळे कुलगुरू फडणवीस यांना तात्काळ बडतर्फ करून या भ्रष्टाचारी चौकशी करा, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यामार्फत मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
निवेदनात पदाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी अशा काळात वसूल केले आहेत, ज्या काळामध्ये घर चालवणे अवघड होते. तरी देखील पालकांनी मुलांचे शिक्षण महत्वाच आहे म्हणून परीक्षा फी भरली आहे.
अनेक पालकांनी एक वेळेचा जेवण करून पोटाला चिमटा देऊन उपाशी रावून अगोदर परीक्षा फी भरली आहे. या काळातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फी माफ करा म्हणून एसएफआय संघटनेच्या वतीने कोरोनाकाळात अनेक निवेदने व विद्यापीठासमोर आंदोलने देखील करण्यात आले होते मात्र परीक्षा फी माफ करण्यात आली नाही. ते माझ्या हातात नाही. राज्य सरकार शिक्षण विभागाकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. असे कुलगुरू मॅडम म्हणून हात झटकून देण्याचा काम केले आहेत.
कोरोना काळात सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांचे उत्तर पत्रिका तपासणीचे कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आले. उत्तर पत्रिका तपासण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठात ८ ते १२ रुपये प्रति पेपर तपासणीचा दर होता. मात्र सोलापूर विद्यापीठाने अर्थात कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस यांनी आपल्या मनमानी कारभार करत ३५ रू. प्रति पेपर तपासणीप्रमाणे कंत्राट मंजूर केले.
यातूनच मोठा भ्रष्टाचार झाला गोपनीयताच्या नावाखाली हा व्यवहार गुप्त ठेवण्यात आला. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. पी. रोंगे यांनी आवाज उठवले असता. त्यांच्या महाविद्यालयाची संलग्नता कुलगुरू मॅडम यांनी काढून टाकली आहे. कलम १२ (७) नुसार असलेल्या विशेषाधिकाराचा त्यांनी १५० वेळा गैरवापर केला, क्रीडा महोत्सव, उपहारगृहामध्ये भ्रष्टाचार व कोणत्याही रीतसर कामाची एकत्रित टेंडर प्रक्रिया राबविणे अपेक्षित असताना त्यांचे तुकडे पाडून टेंडर काढून चुकीच्या पद्धतीने व जवळच्या व्यक्तीला ठेके देणे एवढेच नाहीतर तर 24 प्रकल्पाच्या माध्यमातून संशोधनकार्य केले. असा खोटा बायोडेटा सादर करून त्या कुलगुरूपदी विराजमान झाल्या.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडवणीस या येत्या ५ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्याआधी कुलगुरूंची सखोल चौकशी करून समितीचा अहवाल सादर होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. या चौकशीत त्या दोषी आढळल्या तर त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ देण्यात येऊ नये. व त्यांच्याकडून चाळीस कोटी रू. वसुल करून कोरोनाकाळातील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फी परत देण्यात यावी.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना तात्काळ अटक करून कठोर शासन कारवाई करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास एसएफआय संघटनेच्या वतीने सर्व महाविद्यालये बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष अतुल फसाले, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जि.स.मं.सदस्य विजय साबळे, जि.क.सदस्य प्रशांत आडम, श्रुतिका बल्ला, रोहित धोत्रे, समर्थ प्याटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments