शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची मागणी;
राज्यव्यापी रक्तदान मानवंदनेचे आवाहन व पुण्यात रक्तदान शिबीराचे आयोजन
पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस मृत्युंजय रक्तदान दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादिवशी संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी, अशी मागणी शिवजयंती महोत्सव समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे.
शनिवार, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी गोल्डन लीफ एसी हॉल, सुभारंभ लॉन्स, म्हात्रे पूल डी. पी. रोड येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत या भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.
अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्तान फेडूयात रक्ताच रक्ताशी नाते जोडूयात ही जाणीव जपत गेली ९ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत.
यामध्ये शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील वीर स्वराज्य घराणी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा संघटना, सहकार, शिक्षण संस्था, वाहतूक संस्था, ढोल-ताशा पथके, उपहार गृह संघटना, सिने कलाकार संघटना यासह विविध क्षेत्रातील लोकांना आम्ही सहभागी केले आहे.त्यामुळे आमचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रक्तदान मानवंदनेमध्ये शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याच्या जिजाऊमॉसाहेब शहाजी महाराज शिवज्योत स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सहभागी सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबक नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ,
सुयार्जी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सरनोबत सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे,
समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत लखुजीराजे जाधवराव,, गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक,
महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, सरनोबत पिलाजी गोळे, सरदार प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महादजी शिंदे सरकार, गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक,
शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे, शुरवीर शेलार मामा, राजेश्री सरदार हांडे, श्रीमंत भोईटे, सरदार मांढरे, स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे,शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे,
पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे, सरलष्कर खंडोजी दरेकर, स्वराज्याचे शिलेदार कुंजीर, स्वराज्यनिष्ठ शेळके, सरदार फडतरे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार रामजी पांगारे, स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस, सरदार काळे, वीर बाजीप्रभु देशपांडे या स्वराज्यघराण्यांचे वंशज, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ढोलताशा पथके, विविध संस्था सहभागी होणार आहेत.
0 Comments