फेडेक्स एक्सप्रेस प्रदर्शित करणार उद्योग अग्रणी आरोग्य सेवांचे सोल्युशन्स

दुसऱ्या वार्षिक ग्रेट इंडियन बायोलॉजिक्स फेस्टिव्हल २०२३ मध्ये होणार सहभागी


मुंबई : फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडेक्स एक्सप्रेस २८ आणि २९ मार्च २०२३ रोजी पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या वार्षिक ग्रेट इंडियन बायोलॉजिक्स फेस्टिव्हल २०२३ मध्ये त्यांचे आरोग्य सेवा सोल्युशन्स प्रदर्शित करीत आहे.

भारतात कोल्ड चेन लॉजिस्टिक्सची मागणी वर्षानुवर्ष वाढत आहे आणि २०२५ पर्यंत २०% पेक्षा जास्त चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) ती अजून वाढण्याची अपेक्षा आहे. मजबूत कोल्ड चेन लॉजिस्टिक्सची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी FedEx या कार्यक्रमामध्ये प्रभावी हेल्थकेअर पॅकेजिंग आणि विशेष ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करेल. भारतात प्रथमच नवीनतम FedEx प्रोप्रायटरी तंत्रज्ञान,  SenseAware SM M4, हे प्रदर्शित केले जाईल.

SenseAware SM M4 या प्रगत आधुनिक देखरेख व नियंत्रण तंत्रज्ञानामध्ये एक मल्टी सेन्सर यंत्र वापरले आहे; जे अतिमहत्वाच्या मालवाहतुकीसाठी अगदी माल पॅक केले जातात त्या क्षणापासून ते माल वितरित होईपर्यंत रिअल टाइम डेटा संकलित करते. नवीनतम  SenseAware SM M4 यंत्र हे आजपर्यंतचे सर्वात जास्त गुणवैशिष्ठ्ये असलेले अष्टपैलू  SenseAware SM  यंत्र आहे. या यंत्रामध्ये वेगवेगळे सेन्सर्स व FedEx प्रोप्रायटरी एयरप्लेन मोड असून FedEx वाहतूक नेटवर्कच्या आत आणि बाहेर काम करण्याची क्षमता आहे.

आरोग्याशी संबंधित मालाच्या वाहतुकीसाठी अत्यंत कडक तापमान नियंत्रण आणि विश्वासार्ह परागमन वेळा आवश्यक असतात. वाहतुकी दरम्यान आरोग्याशी संबंधित माल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ते योग्य तापमानात वितरित केले जातील याची खात्री करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग सोल्यूशन्स आहेत.

त्यापैकी बरेच- जसे की मेडपॅक थरमो १३, मेडपॅक फ्रोझन १०, अॅम्बिअन्ट शिपर बॉक्स आणि नवीन पॅकेजिंग सोल्यूशन्स नॅनोकूल- बूथ क्रमांक २८ येथे प्रदर्शित केले जातील. नॅनोकूल हे वापरण्यास सोपे असून त्यास प्री कन्डिशनिंगची आवश्यकता नाही आणि केवळ एक बटण दाबून ते तयार होऊ शकते. हे विविध आकारात येते आणि मालाचे तापमान ९६ तासांपर्यंत सतत २ ते ८ डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवते.

FedEx Express च्या भारताच्या ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष श्री. सुवेन्दू चौधरी याबाबत अधिक सांगताना म्हणाले, “आरोग्य सेवा प्रदात्यांना विशिष्ट शिपिंग सेवांची आवश्यकता असते ज्या अखंडपणे गुणवत्ता, प्रामाणिकता, अचूकता आणि नियंत्रणास समर्थन देतात. FedEx त्याच्या लवचिक जागतिक नेटवर्कद्वारे दररोज वेळ आणि तापमान संवेदनशील आरोग्य सेवा पॅकेजेस वितरित करते. पाच खंडांमध्ये ९० पेक्षा जास्त कोल्ड चेन सुविधा निर्माण करून आरोग्य सेवा बाजारपेठेतील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही मजबूत आरोग्य सेवा पुरवठा साखळी, कोल्ड चेन क्षमता आणि दशकांपासून असलेले कौशल्य यांमध्ये गुंतवणूक केली आहे.”


Post a Comment

0 Comments