जुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघ यांचे भव्य शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता वाघ, जुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघ, पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी, मल्हार कृषी सेवा केंद्र या देहात केंद्राचे संचालक संदीप वाघ, देहातचे सह-संस्थापक आणि संचालक अमरेंद्र सिंग, देहातच्या कृषी निविष्ठा विभागाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ चौधरी तसेच अन्य टीम मेंबर उपस्थित होते.
यावेळी जुन्नर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय वाघ म्हणाले, आमच्या भागातील शेतकरी नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला व अन्य कृषी मालाचे उत्पादन करतात, मात्र आपल्या मालासाठी बाजारपेठ शोधताना त्यांना नेहमीच अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
देहातशी भागीदारी केल्यामुळे आमच्या शेती व्यवसायाला व्यापक बाजारपेठ मिळेल, असा आम्हाला विश्वास वाटतो." देहातशी जोडले गेलेल्या शेतकऱ्यांपैकी मंगेश हांडे व नितीन वामन यांनी देहात पीक पोषण उत्पादने, पशु खाद्य आणि शेतमाल खरेदी सेवा यांच्यामुळे आपल्याला कसा लाभ झाला याचे अनुभव मांडले.
देहातचे सह-संस्थापक आणि संचालक अमरेंद्र सिंग यांनी देहातच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने देहातची स्थापना झाली. आम्ही ११ वर्षांपूर्वी एका छोट्या गावात सुरूवात केली आणि आता ११ राज्यांमध्ये आमचा विस्तार झाला आहे.
सिद्धार्थ चौधरी यांनी देहात किसान ॲप या देहातच्या कृषी तंत्रज्ञान-आधारित प्लॅटफॉर्मची माहिती दिली. तसेच यातील कृषी सल्ला, उत्पादनांची खरेदी व घरपोच सेवा, माती परीक्षण, हवामान आधारित पीक विमा अशा सुविधांचीही त्यांनी माहिती दिली. ज्याचे शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक सुद्धा करून पाहिले.
देहातचे महाराष्ट्र विस्तार व्यवस्थापक विशाल राजे भोसले म्हणाले कि भाजीपाला पिके, द्राक्ष, डाळिंब आणि उसासाठी देहातची पीक पोषण उत्पादने, स्टार्टर, बूस्टमास्टर आणि न्यूट्रीवन हि शेतकऱ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण पीक व भरघोस नफा देतील.
पशुखाद्य विभागाचे कॅटेगरी मॅनेजर संदीप शेळके यांनी दुभत्या पशूंच्या आहाराचे व्यवस्थापन कसे करायचे, याचे विवेचन करतानाच खुराक, दूध प्लस आणि वेटनोकल गोल्ड प्लस या उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतो, हे सांगितले.
देहात शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला विकत घेऊन त्यांना जास्तीचे उत्पन्न मिळविण्यासाठी कशी मदत करत आहे, हे देहातच्या कृषी उत्पन्न खरेदी विभागाचे व्यवस्थापक संदीप वाघ आणि शुभम भोर यांनी समजावून दिले.
देहातचे महाराष्ट्र एक्स्टेंशन मॅनेजर उमेश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
0 Comments