भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये रिजनल कॉन्क्लेव्हचे आयोजन

'जस्टिस एज्युकेशन इन एशिया' विषयावर ७ व ८ फेब्रुवारीला होणार मंथन


पुणे : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये 'जस्टिस एज्युकेशन इन एशिया ' या विषयावर ७, ८ फेब्रुवारी रोजी  रिजनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.भारती विद्यापीठच्या विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि  न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती दिली.


ग्लोबल अलायन्स फॉर जस्टिस एज्युकेशनच्या सहकार्याने ही कॉन्क्लेव्ह ऑनलाईन आयोजित करण्यात आली असून सामाजिक न्यायासाठी नेटवर्क बांधणी हा या कॉन्क्लेव्ह चा उद्देश आहे.


भारत, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, ताजिकीस्तान, सौदी अरेबिया येथील विविध विद्यापीठांचे अधिष्ठाता, प्राद्यापक, संशोधक, विधीज्ञ, विद्यार्थी सहभागी होणार आहेत.


डॉ. उज्ज्वला बेंडाळे, सय्यद मसूद नूरी, एम आर के प्रसाद, अजय पांडे, अनीसा शेख,लेनी मुलयानी, उज्ज्वला साखळकर मार्गदर्शन करणार आहेत.कॉन्क्लेव्ह साठी गुगल फॉर्म भरून सहभागी होता येईल.

Post a Comment

0 Comments