JEE Mains-2023 : जेईई मेन्स परीक्षेचा निकाल घोषित, या लिंक वर तपासा निकाल

File Photo


पुणे : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेली सर्वांत महत्वाजी जेईई मेन्स-२०२३ परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल घोषित झाला आहे. काही दिवसांपूर्वी जेंव्हा अंतिम उत्तरपत्रिका प्रकाशित झाली, त्यानंतर या निकालाची विद्यार्थ्यांना मोठी प्रतीक्षा होती.


 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून सोमवारी रात्री उशिरा निकालाची घोषणा करण्यात आली. पहिल्या सत्रासाठी जेईई मेनची परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली.


या पहिल्या सत्राच्या परीक्षेला तब्बल ९ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. या नऊ लाखांपैकी ८ लाख ६० हजार विद्यार्थी हे पेपर-१ म्हणजे बीई किंवा बीटेकसाठी, तर ४६ हजार विद्यार्थी हे पेपर-२ म्हणजे बी आर्क आणि बी प्लानिंगसाठी बसले होते. या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याची विद्यार्थ्यांना मोठी प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता संपली आहे.


खालील लिंक वर जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल बघता येईल. 

https://ntaresults.nic.in/resultservices/JEEMAIN-auth-23

Post a Comment

0 Comments