एलिस्टाकडून उच्च दर्जाचे डेझर्ट कूलर्स परवडणाऱ्या किंमतीत सादर


पुणे : भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू, आयटी व मोबाईल अॅक्सेसरीजची प्रमुख उत्पादक कंपनी असलेल्या एलिस्टाने आज नवीन डेझर्ट कूलर्स सादर करण्याची घोषणा केली. हे डेझर्ट कूलर्स महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहेत. एलिस्टाने ग्राहकांना अत्यंत हवाहवासा असलेला दिलासा परवडणाऱ्या किमतीत देण्यासाठी हे कूलर्स तयार केले आहेत.


कंपनीने डेझर्ट स्नो माँक आणि अरोरा कूल असे दोन डेझर्ट कूलर जोडले आहेत. या दोन्ही मॉडेल्ससोबत एक वर्षाची वॉरंटी असून त्यांची पाण्याची क्षमता ९० लिटर इतकी मोठी आहे. हे दोन्ही १०० वॅट्सच्या हेवी-ड्युटी मोटरसह १३५० आरपीएम वर कार्य करतात. याची सर्वात वरची फ्रेम टफन्ड ग्लासने तयार करण्यात आली आहे.


एलिस्टाचे सीईओ पवन कुमार म्हणाले, कूलर सेगमेंटमध्ये एलिस्टाने जोरदार वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्र, हे आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असून या प्रमुख बाजारपेठांमध्ये आमचे स्थान मजबूत करण्यावर आमचे लक्ष केंद्रीत आहे.


हवामानाची परिस्थिती आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आमच्या डेझर्ट कूलरची रचना करण्यात आली आहे. आम्ही प्रमुख बाजारपेठांमध्ये आमची उपस्थिती वाढवत आहोत आणि दुय्यम व तिय्यम दर्जाच्या शहरांमध्ये बाजारपेठेतील अधिक लक्षणीय वाटा मिळविण्यासाठी उत्सुक आहोत.


एलिस्टाच्या डेझर्ट स्नो मंक आणि डेझर्ट अरोरा कूल यांमध्ये मोठा ब्लोअर असून त्याचा वाऱ्याचा झोत (एअर थ्रो) ३५ फूट आहे. हवा ताजी आणि स्वच्छ राहावी, यासाठी त्यांमध्ये डास आणि धुळीचे फिल्टर नेट बसविलेले आहेत. भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन रचना करण्यात आलेले हे डेझर्ट कूलर्स कार्यक्षम असून त्यांमध्ये केवळ २३० वॅट ऊर्जा वापरली जाते. त्यांमध्ये अधिक शीतलतेसाठी अतिरिक्त मोठे हनीकॉम्ब कूलिंग पॅड देखील आहेत.


किफायती दरात दर्जेदार उत्पादने देण्यासाठी एलिस्टाची ओळख आहे. आपल्या डेझर्ट कूलर रेंजच्या माध्यमातूनही कंपनी सर्वोत्तम वैशिष्ट्ये, उत्कृष्ट दर्जाची बांधणी आणि आकर्षक डिझाइन सादर करत आहे. डेझर्ट स्नो माँक कूलर पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध असून डेझर्ट अरोरा कूल हे पांढर्‍या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे. एलिस्टाच्या डेझर्ट कूलरची नवीन श्रेणी ७८९९ रुपयांपासून अगदी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.


उच्च दर्जाच्या उत्पादनांमुळे एलिस्टाची वाढ होत असून किफायती किमतींत उत्कृष्ट दर्जाशी ती समानार्थी बनली आहे. जगासाठी भारतात उत्पादन करणे, हे एलिस्टाचे सुरुवातीपासूनच ब्रीदवाक्य राहिले आहे. भारतात आपली मुळे प्रस्थापित केल्यामुळे, कंपनी आता जागतिक विस्ताराकडे पावले टाकत आहे.


कंपनीने अलीकडेच यूएईच्या बाजारपेठेत कामकाज सुरू केले आहे आणि लवकरच सीआयएस आणि एमइएनए क्षेत्रांमध्ये ती पोहोचेल. एलिस्टा यावर्षी भारतात आपले उत्पादन युनिटसुद्धा स्थापन करणार आहे.

Post a Comment

0 Comments