पुण्यात रविवारी राज्य बुद्धिबळ स्पर्धा

विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन


पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १४ वी एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा येत्या रविवारी २९  जानेवारी रोजी होणार आहे.


महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स या ठिकाणी होत आहे. ही स्पर्धा खुल्या; तसेच १४ आणि १० वर्षांखालील अशा तीन गटांत होणार आहे. स्वीस लीग पद्धतीने होणारी ही स्पर्धा एकूण सात फेऱ्यांमध्ये होईल. आतापर्यंत शंभरहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 


या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकरसह प्रियांशू पाटील, चंद्रकांत डोंगरे, सौरभ म्हामने, केवल निर्गुण, अर्णव नानल, रोहित पाटील, आर्यन सिन्हा, हितांश जैन, ओंकार देशपांडे, आदित्य जोशी आदी प्रमुख खेळाडूंचा सहभाग आहे.


या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके; तसेच करंडक, पदके व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती विनायक नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड आणि क्रीडा समिती अध्यक्ष भूषण मोरे यांनी दिली.


या स्पर्धेच्या नोंदणी गुगल फॉर्मने दिप्ती शिदोरे यांचेकडे करावी. अधिक माहितीसाठी राजेंद्र शिदोरे (९८९०४८५६६६) आणि दीप्ती शिदोरे (९६०४७३७१८३) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments